Share

‘उमेदवारी मिळाली नाही तरी फडणवीसांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी मी कटीबद्ध’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांत घेतलेले लोकहिताचे निर्णय व केलेल्या विकासकामांची माहिती देऊन आगामी निवडणुकीसाठी जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा शनिवारी लातूर जिल्ह्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध मतदारसंघांत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभा झाल्या.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा अहमदपूरमध्ये आली असता आमदार विनायक पाटील यांनी ‘मला उमेदवारी दिली नाही तरीही मी कायम मुख्यमंत्री साहेबांसोबतच राहणार आहे. असे म्हणत मतदार संघातील उलट सुलट चर्चेला पूर्णविराम दिला आहे. काही दिवसांपासून विनायक पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळाली नाही तर ते पक्षांतर करतील किंवा अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. परंतु त्याला आता पूर्ण विराम मिळाला आहे.

पुढे बोलताना विनायक पाटील यांनी पक्षातील नाव न घेता काही जनांना समज देण्याची गरज आहे असं विधान केले. त्याचबरोबर मुख्यमंत्री यांच्याकडे चाकुरसाठी विविध विकास कामे मागीतले. लातुर रोड येथुन नांदेड कडे जाण्यासाठी रेल्वे, चाकूरच्या नगर पंचायतला दोन वर्षांपासून कोणतेही काम दिले नाही त्यांनाही काम देण्यात यावे अशी मागणी केली.

दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्री यांनी जनतेला तुम्ही विनायकराव पाटील यांच्या सोबत आहात का असा प्रश्न विचारला त्याला उपस्थितांनी जोराच्या जल्लोषात त्यांना दुजोरा दिला. त्यामुळे आता भाजपची उमेदवारी नक्की कोणाला मिळेल हे पाहणे खुप उत्सुकतेचे ठरणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!