भोकरदन: भोकरदनमध्ये महाजनादेश यात्रा आली तेव्हा मला काहीजणांनी प्रश्न विचारला की, भोकरदन तर रावसाहेब दानवे यांचा गड आहे. इथून भाजपचा उमेदवार निश्चित निवडूण येणार आहे. मग यात्रा काढण्याची काय गरज? यावर मी उत्तर दिले, भोकरदनमधील सभा माझ्यासाठी शुभ ठरत आली आहे. 2014 मध्ये मी इथे सभा घेतली आणि आम्ही राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता घालवली. आता पुन्हा एकदा त्यांना चारीमुंड्या चीत करण्यासाठी भोकरदनमध्ये सभा घ्यायला आलो असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. महाजनादेश यात्रा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या गावात आणि मतदारसंघात होती.
रावसाहेब दानवे यांनी आतापर्यंत या मतदारसंघात मोठे विजय मिळवले आहेत, पण त्यांचे चिरंजीव संतोष पाटील हे म्हणजे ‘बाप से बेटा सवाई’ असे आहेत. येणाऱ्या निवडणुकीत ते रावसाहेब दानवे यांचे सगळे रेकॉर्ड मोडतील असा मला विश्वास असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार संतोष दानवे यांच्यावर स्तुतीसमुमने उधळली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संतोष दानवे हे सर्वात युवा आमदार आहेत. रावसाहेब दानवे यांनी अनेक रेकॉर्ड केले, पण त्यांचा रेकॉर्ड मोडण्याची धमक ही फक्त एकाच माणसात आहे, ते म्हणजे आमदार संतोष दानवे. त्यांना तुम्ही विक्रमी मतांनी निवडून देणार अशी मला आशा आहे, आणि ते किती मतांनी निवडूण येतील हे विचारण्यासाठी मी या जनादेश यात्रेच्या निमित्ताने आलो आहे.
याशिवाय वॉटरग्रीड, सिंचन, शेतकऱ्यांना विविध माध्यमातून केलेली मदत, मतदारसंघात सुरू असलेली रस्त्यांची कामे याचा उल्लेख करत भाजप उमेदवारांच्या पाठीशी आपले आशिर्वाद कायम राहू द्या असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. आमदार संतोष दानवे यांच्या वतीने या सभेत कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश, तसेच रामेश्वर सहकारी साखर कारखान्यातर्फे देखील मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
भाजप-शिवसेना युतीविषयी दानवेंनी केले मोठे विधान, म्हणाले…
प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांची राजकारणात एंट्री


