टीम महाराष्ट्र देशा :-महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहरात लावण्यात आलेले डिजिटल पोस्टर्स हटवले आहेत. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा सुरु आहे. ही महा जनादेश यात्रा मराठवाड्यातून सोलापुरात येत असून उद्या सोलापुरात या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप होणार आहे.
त्याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील भाजप कार्यकर्त्यांनी सदर नेत्यांच्या स्वागतासाठी शहरात सर्वत्र हे पोस्टर्स लावले होते.सोलापुरात अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांचे पोस्टर्स हटवले. डिजिटल झोनमध्येही पोस्टर्स लावण्यात आले होते.मात्र महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने ते हटवले आहेत.
दरम्यान पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पालिका आयुक्त दीपक तावरे यांना फोन करून या अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करण्याची सूचना केली होती. त्यानुसार महानगर पालिकेच्या अतिक्रमण पथकाने पोलीस संरक्षणात ही कारवाई केली.राज्यात जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात भाजपने महाजनादेश यात्रा काढली. या यात्रेचा दुसरा टप्पा सुरु असून याचा समारोप 1 सप्टेंबरला होणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

