Share

शरद पवारांना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावरून कॉंग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजप-सेनेत प्रवेश केला आहे. तर अनेक नेते भाजप-सेनेच्या वाटेवर आहेत. शरद पवारांच्या विश्वासातल्या नेत्यांनी पक्षाला राम राम केलाचं आहे, पण आता नातेवाईक ही पक्षांतर करत आहे. याच संदर्भात श्रीरामपुरच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना प्रश्न विचारला असता. पवारांनी पत्रकारावर संताप व्यक्त केला आणि पत्रकार परिषदेतून जाण्याची विनंती केली.

यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक फोटो पोस्ट करून पवार साहेबांना प्रश्न विचारणारे नि:पक्षपाती पत्रकार श्रीरामपूरचे हरीश दिमोटेजी विखेंच्या गाडीवर पार्टटाइम ड्रायव्हर म्हणून रोजी रोटी कमावतात, पत्रकारिता हा त्यांचा छंद आहे असं विधान करत दिमोटे यांच्यावर टीका केली होती. याला युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सत्यजित तांबे यांनी मी स्वत: हरीष दिमोटेला गेली 15-17 वर्ष बघतो आहे. हरीष सारखे अनेक पत्रकार हलाखीच्या जीवनातून संघर्ष करत प्रगती करणारे आहेत. स्वत:ची गाडी घेतली व त्यात कुणी मोठा माणूस बसला की कौतुकाने आपण फोटो काढतो. लगेच त्याला ट्रोल करणं म्हणजे मुर्खपणाचं आहे असं ट्वीट केले आहे.

तसेच पुढे त्यांनी अनेकदा पत्रकार बातमीच्या नादात नेत्यांना वैतागून सोडतात, पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ माणसाने एकदा “हा विषय घेऊ नका” सांगितल्यावर हरीषने थांबायला पाहीजे होते हे बरोबर, मात्र त्यामुळे त्याला अशा पद्धतीने ट्रोल करणं चुकीचे आहे. ही माझी भूमिका आहे”, असं ट्वीट सत्यजित तांबे यांनी केलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!