🕒 1 min read
मुंबई : फ्लाईंग सिख म्हणून ओळख असलेले दिग्गज धावपटु मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसापुर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले होते. पण मात्र अखेर कोरोनाविरुद्धच्या लढ्यात त्यांची हार झाली. त्यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
बॉलीवुडमध्ये खिलाडी कुमार म्हणून ओळख असलेला अक्षय कुमारनेही मिल्खा सिंग यांना ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. मात्र या ट्विट मध्ये त्याने एक खंत व्यक्त केली आहे. या ट्विटमध्ये अक्षय म्हणतो की, ‘मिल्खा सिंग यांच्या निधनाने खुप दु:ख झाले आहे. त्यांची भूमिका मी मोठ्या पडद्यावर साकारु शकलो नाही याची खंत मला कायम राहील. मला आशा आहे की स्वर्गातील तुमची धावही सुवर्णपदक मिळवुन देईल फ्लाईंग सिख ओम शांती’ असे ट्विट केले आहे. त्यांचे पात्र पडद्यावर साकारु न शकल्याची खंत अक्षयने व्यक्त केली आहे.
Incredibly sad to hear about the demise of #MilkhaSingh ji. The one character I forever regret not playing on-screen!
May you have a golden run in heaven, Flying Sikh. Om shanti, Sir ????????— Akshay Kumar (@akshaykumar) June 19, 2021
प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर आधारीत ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटात फरहान अख्तरने मिल्खा सिंग यांची भूमिका साकारली होती. मात्र फरहानच्या पुर्वी ही भूमिका करण्यासाठी अक्षय कुमारला विचारण्यात आले होते. मात्र अक्षयकडे त्यावेळी तारखा नसल्याने त्याने या भूमिकेसाठी नकार दिला. यानंतर ही भूमिका फरहान अख्तरने साकारली होती. हा चित्रपट सुपरहीट ठरला होता.
महत्वाच्या बातम्या
- ‘आँखोमे बसे हो तूम’ गाण्यावर शालूचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल
- अजितदादा… हे वागणं बरे नव्हे… आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज होणे हे संतापजनक आहे
- पडद्यावरील ‘मिल्खा सिंग’ फरहानने वाहिली श्रद्धांजली ; म्हणाला, विश्वास बसत नाहीये…
- मिल्खा सिंग यांचा वारसा सदैव सोबत राहील; अनिल कुंबळेंच्या भावना
- पहिल्या दिवशी वरुणदेवाने बॅटिंग केल्यामुळे खेळ वाया; दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
