Share

वहिनीसाहेबांनी महिलांच्या आत्मसन्मानाबद्दल मांडलेल्या भूमिकेचे मी स्वागत करते-रुपाली पाटील

Published On: 

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी त्या म्हणाल्या, स्त्रियांच्या पर्सनल आयुष्यावर बोललं जातं पण, आपल्याला ही मानसिकता बदलायची आहे. तुम्ही हे विसरुन जा, की मी देवेंद्र फडणवीसांची बायको आहे. मी सामान्य स्त्री म्हणून बोलत असते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी अमृता फडणवीस यांना चिमटा काढला आहे.

रुपाली पाटील ट्विट करत म्हणाल्या, ‘महिलासन्मान : माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस वाहिनीसाहेब यांच्या महिलांच्या आत्मसन्मानाबद्दल मांडलेल्या भूमिकेचे महिला म्हणून स्वागत..’ असे अमृता म्हणाल्या आहेत.

यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मला जे काही दिसतं मी त्याबद्दल बोलत असते. मला खड्डे, वाहतूक कोंडीचा किती त्रास होतो, हे मला माहित आहे. मी एका सामान्य स्त्रीसारखी बाहेर निघते. मी जे काही बोलते ते एक सामान्य नागरिक म्हणून बोलते. त्यामुळे तुम्ही हे विसरून जा की मी देवेंद्र फडणवीसांची बायको आहे. मानसिक संतुलन गेलाय, अशी भाषा करणे योग्य नाही. आज मुंबईत वाहतूक कोंडीमुळे ३ टक्के घटस्फोट होतात, कारण की लोकांना घरी वेळ देता येत नाही, हे सर्व बंद झालं पाहिजे. त्यासाठी बोलले पाहिजे.’ असे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!