🕒 1 min read
मुंबई : ६ फेब्रुवारीपासून भारताची वेस्ट इंडिज विरुद्ध मालिका सुरु होणार होती. मात्र त्याआधीच भारतीय अनाघातील काही खेळाडूंना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यात भारताचा सलामीवीर शिखर धवन सुद्धा पॉझिटिव्ह आला. शिखरने गुरुवारी त्याच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहली आहे.
शिखर धवन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. त्याने आयसोलेशन मध्ये असताना एक भावनिक पोस्ट केली आहे ज्यात त्याने लिहले ” तुमच्या प्रेम आणि काळजीसाठी सर्वांचे धन्यवाद. मला आता बरे वाटत आहे” त्याने स्मितहास्य करत आणि हात जोडलेला फोटो यावर लावला आहे. कोरोना पॉसिटीव्ह आलेल्या खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड आणि नवदीप सैनी यांचा समावेश आहे. दरम्यान, वनडे मालिकेसाठी मयंक अग्रवालचा संघात समावेश करण्यात आला आहे.
Thank you everyone for your wishes ???? I’m doing fine and humbled by all the love that’s come my way ???? pic.twitter.com/oKvyXAwGk9
— Shikhar Dhawan (@SDhawan25) February 3, 2022
भारत ६ फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर तीन सामन्यांची टी ट्वेन्टी मालिका खेळणार आहे. यावेळी सर्वांच्या नजरा रोहित शर्मावर असतील. कारण ही मालिका एकदिवसीय कर्णधार म्हणून त्याची पहिली मालिका आहे. तो कसोटी मध्येही कर्णधार बनण्याची शक्यता आहे. तरीही अद्याप पुष्टी झालेली नाही. कारण त्याच्या फिटनेसची चिंता भारतीय संघासाठी अजूनही एक समस्या आहे.
महत्वाच्या बातम्या
- अल्लू अर्जूनने ट्विटरवर रजनीकांतलाही टाकलं मागं, नेटकरी म्हणाले खरोखर फायर आहेस
- “नाहीतर महाराष्ट्रातील निम्मे साखर कारखाने बंद झाले असते…”; नितीन गडकरी
- भारताचा माजी कर्णधार आणि विद्यामान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याचा राहणे आणि पुजाराला ”मोलाचा” सल्ला…
- बंडातात्याविरुद्ध रुपाली पाटलांचा पुणे न्यायालयात पहिला खटला दाखल
- “कोहली आणि कुंबळे यांचे जमत नव्हते” ; माजी व्यवस्थापकांचा गौफ्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
