Share

युपीत सेना ५० ठिकाणी उमेदवार देणार; संजय राऊतांची घोषणा

Published On: 

लखनौ : शिवसेना खासदार संजय राऊत (big announcement of Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी युपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. आज त्यांनी युपीत प्रचारासाठी हजेरी लावली. यंदाच्या युपी निवडणुकीत सेना ५० ते ६० टक्के उमेदवार उभे करणार (Shiv Sena will field 50-60% candidates in UP elections)असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

युपीत सात टप्प्यात निवडणुका होणार आहे. त्याचा पहिला टप्पा लवकरच होणार आहे. त्यापूर्वी संजय राऊतांनी ही घोषणा केली आहे. उत्तर प्रदेश ही सर्वांत मोठी निवडणूक असून, देशातील राजकीय वळण युपी निवडणुकीतून मिळत असते. असेही ते म्हणाले आहे. शिवसेना यावेळी ५० ते ६० टक्के उमेदवार उभे करणार असून २० टक्के उमेदवार अगोदरच ठरले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे युपीत १५ ते २० जागांसाठी आम्ही उमेदवार उभे करणार असून या निवडणुका संपल्यावर लोकसभा निवडणुकांवर लक्ष देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे की, महाराष्ट्राबाहेरही शिवसेनेने उमेदवार उभे करावे. त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना १०० उमेदवार उभे करणार आहे. महाराष्ट्राबाहेर सेनेची सुरुवात दादरा नगर हवेली निवडणुकीपासून झाली आहे. याठिकाणी सेनेचा उमेदवार निवडून आल्याने आता दक्षिण गुजरात मार्गाने आम्ही पुढे जाणार असल्याचे संजय राऊतांनी म्हटले आहे.

यावेळी त्यांनी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही निशाणा साधला. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Assaduddin Owaisi) यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर काल मेरठहून दिल्लीला परतताना गोळ्या चालवत हल्ला झाला, यावरच त्यांनी युपीत माफियाराज संपले असते योगी आदित्यनाथ म्हणतात. पण दुसरीकडे एका राष्ट्रीय पार्टीच्या नेत्यावर हल्ला होतो. या राज्यात शेतकरी, माफिया असे अनेक प्रश्न असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!