🕒 1 min read
मुंबई : सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) त्याच्या ‘पुष्पा द राइज’ (film ‘Pushpa The Rise’) चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. त्याच्या चित्रपटातील भूमिकेसह, त्याच्या डायलॉगला अनेकांनी कॉपी करत व्हिडीओ देखील शेअर केले आहे. मात्र आता एक नवीन माहिती समोर आली असून अल्लू अर्जुनने सुपरस्टार थलैवी रजनीकांतला (South Superstar Thalaivi Rajinikanth) मागं टाकलं आहे. प्रकरण काय आहे, बघु या.
दरम्यान अल्लू अर्जुन त्याच्या ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटामुळे चाहत्यांच्या गळयातील ताईत बनला असून त्याला फायर असल्याचं कमेंट करत आहेत. आता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ने सोशल मीडियावर एक नवीन स्थान मिळवलं आहे. तो साऊथ सुपरस्टार थलैवी रजनीकांत यांही मागं टाकलं आहे. अल्लू अर्जुनचे ट्विटरवर ६.५ मिलियन म्हणजेच ६५ लाख फॉलोअर्स आहेत. तर थलैवी रजनीकांत यांना ट्विटरवर ६.१ दशलक्ष फॉलो करतात. विशेष म्हणजे अल्लू अर्जुन ट्विटरवर कोणालाही फॉलो केलेलं नाही. त्याच्या ट्विट अकाऊंटवर संख्या पाहिली तर ती शून्य आहे.
![]()
![]()
अल्लू अर्जुनला अमिताभ बच्चन, रकुल प्रीत सिंग, रश्मिका मंदान्ना आणि समंथा प्रभू असे सर्व स्टार्सनी फॉलो केलं आहे. अल्लू अर्जुन इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असून त्याला १६.२ दशलक्ष फॉलोवर आहेत. तो फक्त पत्नी स्नेहा रेड्डीला फॉलो करतो. सुपरस्टार रजनीकांत इंस्टाग्राम वापरत नाहीत, त्यांनी इंस्टाग्रामवर फक्त एक पोस्ट शेअर केली असून ८२१ हजार युजर्स फॉलो करत असल्याची माहिती मिळाली आहे.
https://www.instagram.com/p/CYktpqNPTHC/?utm_source=ig_web_copy_link
अल्लू अर्जुनचे फेसबुकवर २१ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तो फेसबुकवर राम चरण, वरुण तेज, चिरंजीवी, आर्य, साई धर्म तेज आणि त्याच्या काही फॅन पेजेससह २० लोकांना फॉलो करतो. अल्लू अर्जुन त्याच्या ‘पुष्पा’ चित्रपटामुळे सध्या ट्रेंडमध्ये आहे. ‘पुष्पा’ने हिंदी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा गाठला असतानाच दक्षिणेतही या चित्रपटाने जबरदस्त व्यवसाय केला आहे. ‘पुष्पा’ OTT वरही रिलीज झाला आहे. सोशल मीडिया तसेच नेटकऱ्यांच्या मनावर ‘पुष्पा’ची जादू कायम दिसतेय.
महत्वाच्या बातम्या
- “ओवेसींचे भाषण ऐकून अस्वस्थ झालो आणि जीवे मारण्याचा कट रचला”, आरोपींची पोलिसांसमोर कबुली
- सचिन तेंडुलकरने केले भारतीय क्रिकेट बद्दल एक मोठे वक्तव्य …
- राज्यात सध्या महाविकास आघाडीचे नव्हे तर टोळी सरकार आहे- चंद्रकांत पाटील
- बिग बॉस फेम तेजस्वी करण कुंद्राशी लग्नासंदर्भात म्हणाली, “तो उमर रियाजसोबत…”
- “…तर पुरावा द्या, चौकशी करून कारवाई करू”, अजित पवारांचे ‘त्या’ आरोपांवरून सोमय्यांना आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
