मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला.
नवख्या खेळाडूंना सोबत घेत रहाणेने भारताला कसोटी मालिकेत विजय मिळवून दिला. यामुळे कर्णधार रहाणेला क्रिकेटविश्वातून कौतुक करण्यात आलं. विराटऐवजी रहाणेलाच कर्णधार करा, अशी मागणी करण्यात आली. रहाणेचं भारतात परतल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आलं.
दरम्यान विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मा गरोदर होती म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून मायदेशी परतला होता. या काळात विराट मायादेशातुनच या खेळाडूंचा उत्साह वाढवत होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी केली यावेळी गाबा कसोटीत वॉशिंग्टन सूंदर आणि शार्दुल ठाकूर भारताच्या या दोन गोलंदाजांनी दमदार फलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. मायदेशात परतलेला विराट कोहली देखील या दोघांच्या फलंदाजीचा आनंद घेत होता. यावेळी कोहलीने त्याची पत्नी रुग्णालयात असतानाचा एक किस्सा शेअर केला आहे.
विराट कोहलीने सांगितलं की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांची फलंदाजी मी आणि अनुष्का बघत होतो. तेवढ्यात डॉक्टरने आम्हाला बोलावलं. कोहली म्हणाला, मला आठवतं जेव्हा शार्दुल आणि वॉशिंग्टन ब्रिस्बेनमधील शेवटच्या कसोटीत चांगली भागीदारी करत होते, तेव्हा मी माझ्या फोनवर सामना पाहत होतो. तेवढ्यात डॉक्टरने बोलावलं. त्यांची फलंदाजी पाहून मला खूप आनंद झाला आणि अभिमान वाटतो ऑस्ट्रेलियामध्ये संपूर्ण संघाने चांगली कामगिरी बजावली.
महत्वाच्या बातम्या
काँग्रेस रक्ताने शेती करतंय, भाजप नव्हे; राज्यसभेत कृषिमंत्र्यांचा हल्लाबोल
- मध्यम वर्गीयांचा अपेक्षाभंग; आरबीआयकडून पतधोरण जाहीर !
- प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होत असलेल्या नाना पटोले यांना ‘या’ आव्हानांचा करावा लागू शकतो सामना
- पुण्यामध्ये पेट्रोलचे दर आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर! 93 रुपये प्रति लीटरने होतेय विक्री
- ‘शेतकरी आंदोलनात माझ्यावर लावलेले आरोप बिनबुडाचे’


