मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमृता फडणवीस यांना काल महाउत्सव कार्यक्रमात अप्रत्यक्ष टोला लगावला होता. या महाउत्सव प्रसंगी उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले, “राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे चांगलं गातात असं मला आदित्यने सांगितलं होतं. मला धक्का होता, मला वाटलं आजपर्यंत एकच व्यक्ती गाते, बाकीचे सुद्धा गातात. या टीकेला अमृता फडणवीस यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले.
अमृता फडणवीस ट्वीट करत म्हणाल्या, “मला सुद्धा धक्का होता, मला वाटलं होतं, अबजाधीश फक्तं आपणच आहात, आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीशच आहे. छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा कुटुंबात”.
मला सुद्धा धक्का होता, मला वाटलं होतं, अबजाधीश फक्तं आपणच आहात, आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा आब्जाधीशच आहे !
छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा कुटुंबात !! @OfficeofUT pic.twitter.com/UsEXftApk1— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) May 2, 2022
दिपाली सय्यद यांचा अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा –
“ऐ ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से !” अशा शब्दात ट्वीट करत अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. याच मुद्द्यावरून दीपाली सय्यद यांनी फडणवीसांवर टीका केली होती. त्या म्हणाल्या, ‘योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागतं. देवेंद्र फडणवीस योगी होण्यासाठी बायकोला सोडणार का? पुढे बोलताना अमृता फडणवीस यांचा उल्लेख ‘मामी’ असा करत, मामी बद्दल काय बोलायचं फडणवीसांनी घरात दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये. अन्यथा ‘मी पुन्हा येईन’ ‘मी पुन्हा येईन’ हे स्वप्नच राहील, कारण शिवसेना ऐकणार नाही, हे लक्षात ठेवा. असा अप्रत्यक्षपणे इशारा देत अमृता फडणवीस यांना फटकारले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

