Share

“…काळातील CBI अहवाल तपासा”, बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती विचारणाऱ्या फडणवीसांना राऊतांचा सल्ला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे १४ तारखेला जाहीर सभा घेणार आहेत. यावरच १४ तारखेनंतरच खरी पोलखोल सभा घेणार असल्याचा इशारा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी काल (१ मे ) सभेत दिला. भ्रष्टाचार तसेच बाबरी पाडल्याच्या  मुद्द्यावरून त्यांनी शिवसेनेला चांगलेच घेरले. बाबरी ढाचा पाडताना शिवसेनेचा एकही नेता हजर नव्हता, असे फडणवीस यांनी म्हटले. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती विचारणाऱ्यांनी त्यांच्याच पक्षातील नेते सुंदरसिंह भंडारी यांना विचारावं. त्या काळातील सीबीआयचा अहवाल तपासा. सीबीआयाने केलेल्या तपासाची पानं आणि केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल तपासावा. शिवसेना कुठे आहे असं विचारणाऱ्या अज्ञानांना शिवसेना कुठे होती आणि काय करत होती हे तेव्हा कळेल.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान बाबरी ढाचा पाडला, तेव्हा मी तेथे होतो. भाजपचे नेते अयोध्येत होते. त्यामुळे बदायूच्या तुरुंगात १८ दिवसांचा तुरुंगवासही भोगला होता. ढाचा पाडल्यानंतर ज्या ३२ जणांवर खटले चालले, त्यात शिवसेनेचा महाराष्ट्रातील एकही नेता नव्हता, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच तुम्ही रामाच्या बाजूचे की रावणाच्या बाजूचे, याचा एकदा निकाल लावा, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!