Share

फडणवीस सरकारने नव्हे, एका भाजप मंत्र्याने मला त्रास दिला होता- डॉ.तात्याराव लहाने

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथील संत वामनभाऊ–संत भगवानबाबा प्रतिष्ठान यांच्यावतीने संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ.लहाने यांनी गेल्या सरकारमध्ये आपल्याला मोठा त्रास झाल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. तर धनंजय मुंडेंनी मला त्या संकटातून सोडवण्यासाठी मोलाची मदत केली अस देखील तात्याराव लहाने म्हणाले होते.

दरम्यान हे वृत्त वाऱ्यासारखे सर्वत्र पसरल्यानंतर आता पुन्हा एकदा तात्याराव लहाने यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मागील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात आपल्याला सरकारने नाही, तर भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्याने खूप त्रास दिला होता, असे स्पष्टीकरण डॉ.तात्याराव लहाने यांनी दिले आहे. आपल्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांनी मदत केल्याचे डॉ.लहाने यांनी म्हटले आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्याला कायमच पाठिंबा दिला. तसेच वेळोवेळी आपल्याला त्यांनी सहकार्य केले, असे डॉ.लहाने यांनी म्हटले आहे. तेव्हाचे विरोधी पक्षनेते व आताचे मंत्री धनंजय मुंडे हेही कायम आपल्या पाठीशी उभे होते, असेही डॉ.लहाने पुढे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!