Share

‘तू शांत रहा, आम्ही तुझ्यासारखे मुर्ख नाही’; जगप्रसिद्ध पॉपस्टारला कंगनाच प्रतिउत्तर !

Published On: 

नवी दिल्ली : नेहमीच प्रत्येक वादात उडी घेणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत पहिल्यापासूनच शेतकरी आंदोलनाचा विरोध करत आली आहे.त्याचबरोबर जे शेतकरी आंदोलनाला पाठींबा देतात त्यांना देखील कंगना वेळोवेळी फैलावर घेत असते. सध्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत असून यावर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि राजकारण्यांचा देखील समावेश आहे.

यामध्येच जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने देखील शेतकऱ्यांना पाठींबा देणारे शेतकऱ्यांविषयी ट्विट केलं होतं. ‘आपण याविषयी का विचार करत नाही’ असं ट्विट रिहानाने केलं होतं. सोबतच तिने ‘#FarmersProtest’ असा हॅशटॅगही वापरला होता. यानंतर आता कंगनाने तिच्या टीकेची तोफ जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहाना हिच्यावर डागली आहे.

“याविषयी कोणी व्यक्त होत नाही कारण ते शेतकरी नसून भारताचं विभाजन करण्याचा प्रयत्न करणारे दहशतवादी आहेत. चीनसारखे देश आपल्या देशावर ताबा मिळवतील आणि अमेरिकेसारखी चिनी वसाहत बनवतील. तू शांत रहा, आम्ही तुझ्यासारखे मुर्ख नाही, जो आमचा देश विकू”, असं खरमरीत प्रत्युत्तर कंगनाने रिहानाला दिला आहे. कंगनाच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1356640083546406913

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या घटनेवर भाष्य करताना स्वतःला शेतकरी म्हणवून घेणारे दहशतवादी आहेत, त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना तुरुंगात टाका, असं तिने म्हटलं होत. याबाबतचा एक व्हिडिओ कंगनाने ट्विटरवरुन पोस्ट केला होता. कंगना रणौतने या पूर्वी देखील या आंदोलनाबाबत अनेक वादग्रस्त विधानं केलेले होते. “जे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, त्या सर्वांना तुरुंगात टाका. तसेच त्यांची सर्व प्रकारची संपत्ती जप्त केली जावी, अशी मागणी करताना हा देश, याचं सर्वोच्च न्यायालय, इथलं सरकार हे सर्व थट्टा बनून राहिलं आहे,” अशा शब्दांत कंगनानं आजच्या घटनेवर भाष्य केलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!