मुंबई : पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण पुणे हादरलं आहे. तर, राज्यभरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे स्वप्निलने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
तर, आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमधून या व्यवस्थेवरच अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. परीक्षा उत्तीर्ण होऊनही दोन वर्षांपासून स्वप्निल मुलाखतीच्या प्रतिक्षेत होता. पण मुलाखतच झाली नसल्यामुळे तो प्रचंड तणावाखाली होता.
यावरून आता विरोधी पक्ष भाजपाकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या घटनेवरून ठाकरे सरकावर आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘संजय राऊत पहाटेच्या आरवण्यात काहीतरी दोन शब्द बोलतील असे अपेक्षित होते, पण ते तर प्रस्थापितांचे पोपट निघाले अशी जहरी टीका वाघ यांनी केली आहे.
पण हे पुन्हा सिद्ध झाले की ते ‘प्रस्थापितांचे पोपट’आहेत..
स्वप्नील लोणकर या आमच्या भावाला भावपूर्ण श्रद्धांजली????(२/२) @CMOMaharashtra @rautsanjay61 @AjitPawarSpeaks @bb_thorat @Dev_Fadnavis @ChDadaPatil @SMungantiwar @ShelarAshish @mipravindarekar @PrasadLadInd @ivikrantpatil— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 4, 2021
स्वप्नील लोणकर या एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या आमच्या भावाचा ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे जीव गेला त्याबद्दल सर्वज्ञानी संजय राऊत यांच्याकडनं अपेक्षित होते की आपल्या नेहमीच्या पहाटेच्या आरवण्यात काहीतरी दोन शब्द बोलतील. नाहीतर नेहमीप्रमाणे केंद्राला तरी दोष देतील. पण हे पुन्हा सिद्ध झाले की ते ‘प्रस्थापितांचे पोपट’आहेत असा टोला वाघ यांनी लगावला. तसेच स्वप्नील लोणकरला त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दरम्यान, आत्महत्या केल्यानंतर राज्यातील इतर स्पर्धा परीक्षा देणारी मुलं थेट सरकारला जाब विचारू लागली आहेत. पुण्यातील काही मुलांशी यासंदर्भात संवाद साधला असता, ‘राजकीय नेत्यांना सर्वसामान्य कुटुंबातील मुलांचं काही देणंघेणं नाही. या नेत्यांना केवळ स्वतःची मुलं सेट झाली पाहिजेत. एवढंच त्यांचं लक्ष आहे. मुख्यमंत्री साहेब, तुमचा २८ वर्षाचा मुलगा मंत्री होतो. पण आमच्या नियुक्तयांचं काय?’, असा परखड पण उद्विग्न सवाल या मुलांकडून विचारला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘स्वप्निलची आत्महत्या नव्हे, हा तर ठाकरे सरकारने केलेला मर्डर आहे!’
- ‘..अन्यथा हेच तरूण तुमच्या गळ्याला फास लावतील’, राजू शेट्टींचा ठाकरे सरकारला इशारा
- ‘अधिवेशन कसे चालवायचे हे आता संज्या सांगणार, इतके खराब दिवस आलेत महाराष्ट्राचे’
- मुख्यमंत्री होऊ न देण्याचे ओवेसींचे आव्हान योगींनी स्वीकारले, म्हणाले..
- ‘राज्याची चिंता असेल तर अधिवेशन चालू द्या, गोंधळ घालू नका’, खा.राऊतांचे विरोधकांना आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

