Share

‘राज्याची चिंता असेल तर अधिवेशन चालू द्या, गोंधळ घालू नका’, खा.राऊतांचे विरोधकांना आवाहन

Published On: 

मुंबई : कोरोनाचे कारण पुढे करून राज्य सरकारने अवघा २ दिवसांचे अधिवेशन घेण्याचे ठरवले आहे. राज्यात अनेक समस्या निर्माण झाल्या असताना आणि कोरोना काहीअंशी आटोक्यात आला असताना अवघ्या दोन दिवसांचे अधिवेशन घेण्यात येणार असल्याने ठाकरे सरकारवर चौफेर टीका होत आहे. सरकारचा नाकर्तेपणा जनतेसमोर येऊ नये म्हणूनच हे अधिवेशन दोन दिवसात उरकण्यात येणार असल्याचा आरोप विरोधीपक्ष करत आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुद्दा मार्गी लावण्याचा प्रयत्न सरकार करणार असून एक मोठे दिव्य या साठी सरकारला पार करावे लागणार आहे. विरोधकांनी देखील या दोन दिवसांच्या अधिवेशनात सरकारला घेरण्याची मोठी योजना आखली असून आक्रमक विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सामना कसा करावा हाच मुख्य प्रश्न महाविकास आघाडीसमोर आहे.

दरम्यान, उद्यापासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकार, शिवसेना यांचे राज्याच्या, जनतेच्या हिताचे बरेच मुद्दे असू शकतात. त्यावर चर्चा होणे, निर्णय होणे, कायदे मंजूर होणे गरजेचं आहे. परंतु, विरोधी पक्षाने अधिवेशन दोन दिवस पूर्णपणे चालू दिले पाहिजे. विरोधी पक्षाला महाराष्ट्राच्या हिताची काळजी असेल तर ते कामकाज दोन दिवस व्यवस्थितपणे चालू देतील. अधिवेशन केवळ दोन दिवसांचे असल्याने गोंधळात ते वाहू देऊ नये, अशी जनतेची इच्छा असल्याचेही राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!