मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर आज सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर रहाण्यास सांगितले होते. हे त्यांना ईडीचे दुसरे समन्स होते. अनिल परब ईडीच्या कार्यालयात हजर होण्यासाठी आले असता त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मी शिवसेनाप्रमुख आणि माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतो मी चुकीचं काही केलं नाही असे परब म्हणाले.
ईडीचे दुसरे समन्स आल्यानंतर परब चौकशीसाठी हजर होण्यासाठी आले आहे. चौकशीसाठी जाण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी परब म्हणाले, मला ईडीचे दुसरे समन्स मिळाले आहे. मी चौकशीला जात आहे. शिवसेना प्रमुख आणि मुलीची शपथ घेऊन मी यापूर्वीही सांगितले आहे की, मी काहीही चुकीचे काम केले नाही. चौकशीत जे प्रश्न विचारले जातील त्याचे उत्तर देईल. मला कशासाठी बोलावले माहित नाही. मला बोलावण्याचे कोणतेही स्पष्ट कारण ईडीने दिले नाही. ईडीच्या कार्यालयात गेल्यावर काय ते अधिकृत कळेल असे परब म्हणाले.
शंभर कोटी वसूली प्रकरणात ईडीने अनिल परब यांना समन्स दिले होते. आज सकाळी ११ वाजता चौकशीसाठी हजर रहाण्याचेही सांगितले होते.अनिल परब येणार असल्याने पोलिसांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता. परब यांना २९ ऑगस्ट रोजी ईडीने पहिले समन्स बजावले होते, ३१ ऑगस्ट रोजी हजर रहाण्याबाबत सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या
- ईडीनं मला चौकशीसाठी का बोलावलं आहे, हे मला देखील माहिती नाही – परब
- पुढच्या 10 निवडणुकांमध्ये धनंजय मुंडेंना कोणीही रोखू शकणार नाही; जयंत पाटलांचा आत्मविश्वास
- ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’; किरीट सोमय्यांचा कोल्हापूर प्रवेशाचा मार्ग मोकळा
- ‘कॉंग्रेसची सध्याची परिस्थिती पाहता मला पक्षाचे कोणतेही भविष्य दिसत नाही’
- दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही हे पवारसाहेबांनी दाखवून दिले होते – जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
