🕒 1 min read
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तीन दिवसांपूर्वी सीबीआयने क्लीन चीट दिल्याची चर्चा होती. तसा सीबीआयचा एक अहवाल लीक झाला होता. त्यानंतर आमचा असा कुठलाही अहवाल नाही, असे सीबीआयने स्पष्ट केले होते. मात्र, आज सीबीआयने त्यांच्या एका कर्मचाऱ्याला आणि अनिल देशमुख यांच्या वकिलांना ताब्यात घेतले आहे. त्यावरूनच आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी टीका केली आहे.
सीबीआयने त्यांचा कर्मचारी आणि अनिल देशमुख यांच्या वकिलांना अटक केली. याचा अर्थ तो प्राथमिक चौकशीचा अहवाल खरा आहे. जेव्हा ही कागदपत्रे बाहेर आली तेव्हाच बचाव करण्यासाठी हा गुन्हा दाखल करून कारवाई केली. चार महिने हा अहवाल मॅनेज झाले किंवा कर्मचारी भ्रष्ट आहे, असे सीबीआयला वाटले नाही. पण लीक झालेला अहवाल न्यायालयात जाऊ शकतो. त्यामुळे वकिलांना अटक करतात. कर्मचाऱ्यांवर कारवाई करतात. तथ्य नसताना गुन्हे दाखल केले जातात, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
परमवीरसिंग यांचे आरोप राजकीय हेतूने होते. सरकारला बदनाम करण्यासाठी होते. प्राथमिक अहवाल बाहेर आल्यावर तो खरा की खोटा सांगितलं नाही. आता त्या अहवालाबाबत गुन्हा दाखल करतात कनिष्ठ अधिकाऱ्याला अटक करतात. देशमुख यांच्या वकिलाला अटक करतात, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्रात सरकारमध्ये बसलेले लोक काय तोंडात पान-गुटखा खाऊन बसलेत का?’
- ‘माझ्या हातावर असलेला ‘देवेंद्र’ चा टॅटू हा फडणवीसांचाच, तेच माझ्या मनात’
- ‘तुम्ही पडद्याआडून पाहात प्रेम का करत आहात?’ ओवेसींचा पंतप्रधान मोदींना सवाल
- ‘वसंतदादांच्या नातवाला विकत घेईल एवढा भाजप मोठा नाहीये’, विशाल पाटील यांचा हल्लाबोल
- ‘गुडमॉर्निंग अण्णा, आमच्यासाठी आंदोलन कधी?’ व्यंगचित्राद्वारे राष्ट्रवादीचा खोचक सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
