पुणे: संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला आज सुरुवात झाली आहे. यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ज्ञानोबा-तुकारामचा जयघोष करीत लाखो वारकरी देहू नगरीत दाखल होतात. टाळ-मृदुंगाच्या गजराने अवघी देहू नगरी दुमदुमली जाते. असे एकंदरीत दर वर्षीचे हे पालखीचे दृश्य आपल्याला पाहायला मिळते. मात्र मागील वर्षापासून संपूर्ण जगावर असलेले संकटामुळे वारीचे असे चित्र आता पाहायला मिळत नाही.
यंदा मात्र मागच्या वर्षीप्रमाणेच कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिराच्या आसपास पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गर्दी न होण्याच्या दृष्टीने मंदिराचे ट्रस्टी आणि प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. तसेच विठ्ठलाला भेट देण्यासाठी ज्ञानेश्वर – तुकारामांच्या पादुका बसने जाणार आहेत. कोरोना संकटामुळे केवळ १० पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे.
आज दुपारी २ वाजता तुकाराम महाराजांच्या मंदिरापासून पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. सकाळपासूनच भजने, कीर्तने कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. मंदिराबाहेर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर दुपारी २ च्या प्रस्थान सोहळ्यानंतर पादुका मुख्य मंदिरात राहणार आहेत. १९ जुलैला सकाळी ९ वाजता पादुका पंढरपूरकडे शासनाच्या बसने जातील. त्यानंतर १९ जुलै ते २४ जुलैपर्यंत पादुका पंढरपूरमध्ये राहणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- भ्याड हल्ल्यानंतर रोहित पवारांचा फोटो ट्विट करून पडळकरांनी नेमके काय दिले आहेत संकेत ?
- इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का ; ‘हा’ खेळाडू मालिकेतून बाहेर
- ‘पंढरीची वारी झाल्यावर देशातील नव्हे जगातील कोरोना नामशेष होईल’
- गीलच्या जागी द्रविडच्या ‘या’ शिलेदाराची वर्णी लागेल का?
- ‘टप्परछाप आचार्य सध्या मस्तीची भाषा करून वारकरी संप्रदायाला बदनाम करतायत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

