Share

मला हाफकिनचे सामर्थ्य माहित आहे; जितेंद्र आव्हाडांनी मानले पंतप्रधानांचे आभार !

Published On: 

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. फक्त निर्बंध लागू करून कोरोना नियंत्रणात येणार नसल्याने आरोग्य सेवेमध्ये देखील मोठी वाढ करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. असे असूनही सध्याच्या लाटेत कोरोना प्रतिबंधक लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन पुरवठा यांचा देखील गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ऑक्सिजनसह रेमडेसिवीरचा आवश्यक पुरवठा उपलब्ध करून द्यावं, असं आवाहन देखील केलं आहे. तसेच, कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण महत्वाचे असल्याने महाराष्ट्राला अतिरिक्त लस पुरवठा करण्यासोबतच महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या हाफकिन संस्थेला लस निर्मती करण्यासाठी परवानगी द्यावी याबाबत देखील त्यांनी मागणी केली होती.

आता हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास परवानगी मिळाली आहे. केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. हे महाराष्ट्रासाठी दिलासादायक असून विविध नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. ‘मला हाफकिनचे सामर्थ्य माहित आहे. लस निर्मिती करण्यासाठीच्या उद्धव ठाकरेंच्या मागणीला मान्यता दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. धन्यवाद !’ असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!