बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. येत्या १७ एप्रिलला या मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. ही लढत तिरंगी झाल्याचं आता दिसून येत आहे. भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी, काँग्रेस कडून आमदार सतीश जारकीहोळी, तर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शुभम शेळके उभे राहिले आहेत.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळकेंना शिवसेनेनं आपला पाठींबा दिला आहे. इतकंच नाही तर १४ एप्रिल रोजी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हे शेळकेंच्या प्रचारासाठी बेळगावात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला होता. यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आपला पाठींबा महाराष्ट्र एकीकरण समितीला जाहीर केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मराठी भाषिकांच्या न्याय-हक्कांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठींबा देत असल्याचं जाहीर केलं आहे. यामुळे, आता भाजपसह राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसची देखील अडचण वाढली आहे. दरम्यन, मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी देखील महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठींबा द्यायला हवा होता असं म्हणत जयंत पाटलांनी त्यांच्यावर निशाणा देखील साधला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्यावर बंदूक ठेऊन काँग्रेसला जिंकवण्याचा प्रयत्न सुरु आहे – फडणवीस
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बेळगावात काल सभा पार पडली आहे. यावेळी, ‘महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्यावर बंदूक ठेऊन काँग्रेसला जिंकवण्याचा प्रयत्न सुरु आहे. कारण इथला मराठी माणूस भाजपला मत देतो. ही मते कमी करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीला उभे करण्याचे काम काही लोकांनी केले आहे. त्यांचा हा उमेदवार देखील स्पॉन्सरड दिसत आहे,’ असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.’
- पंढरपूर – मंगळवेढ्याला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप भाजपनेच केले – राष्ट्रवादी
- सरकार कोणाचंही असो उपमुख्यमंत्री अजित पवारच; चंद्रकांतदादांचा टोला
- मुख्यमंत्री फार सौम्य आहेत, त्यांनी कठोर पावलं उचलली पाहिजे – संजय राऊत
- ‘घराघरात भांडणं लावून घरं फोडली त्या शरद पवारांच्या घरातच आता टोकाची भांडणं सुरू आहेत’
- ‘भाजपकडे 105 तर महाविकास आघाडीकडे 170 आमदार आहेत; मग सत्तापरिवर्तन कसे होणार?’


