Share

सरकार कोणाचंही असो उपमुख्यमंत्री अजित पवारच; चंद्रकांतदादांचा टोला

Published On: 

पंढरपूर : पंढरपूरमध्ये सध्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या मतदारसंघावर विजय मिळवण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी ठाण मांडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे.

आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून १५ एप्रिल रोजी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राजकीय नेत्यांमध्ये जुंपल्याच दिसून आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूरमधल्या सभेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच, चंद्रकांत पाटील यांचा ‘चंपा’ असा उल्लेख करत त्यांना पुन्हा एकदा डिवचलं आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटलांनी काल माध्यमांशी बोलताना अजित पवारांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘अजित पवार यांना काय झालंय माहीत नाही. अलीकडच्या काळात ते जोरात आहेत. माझी शरद पवार यांच्यावरील पीएच.डी. अजून पूर्ण झाली नसली तरी आता मी अजित पवार यांच्यावरही एमफील करणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले की, हेच उपमुख्यमंत्री. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले की हेच उपमुख्यमंत्री. सरकार कोणाचंही असो उपमुख्यमंत्री अजित पवारच.’ असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!