मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
मात्र, काल (१५ एप्रिल) रोजी अनेक ठिकाणी गर्दी आटोक्याबाहेर गेल्याच चित्र समोर आलं आहे. त्यामुळे नक्की संचारबंदी आहे की नाही ? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी भाजीपाला, किराणा व इतर आवश्यक सुविधा सुरु ठेवण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील नागरिक किराणा दुकानाबाहेर, भाजी मार्केटमध्ये, लोकलमध्ये मोठी गर्दी करत असल्याने नियम अधिक कठोर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अशातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘मुख्यमंत्र्यांना कठोर पावलं उचलायला लावू नका’ असे आवाहन महाराष्ट्रातील जनतेला केले आहेत. ‘मुख्यमंत्री फार सौम्य आहेत. ते माणुसकी आणि दया दाखवत आहेत. लोकांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री अस्वस्थ आहेत. त्यांनी कठोर पावलं उचलली पाहिजे, असं सांगतानाच कोरोनाचे नियम पाळा. मुख्यमंत्र्यांना कठोर पावलं उचलण्यासाठी प्रवृत्त करू नये’, असं आवाहनही त्यांनी केलं.
महत्वाच्या बातम्या
- ‘आलिया भोगासी- असावे सादर…’ ; लॉकडाउनच्या निमित्ताने फोटो शेअर करत चाहत्यांना केले आवाहन
- जालना जिल्ह्यात पंधरा ठिकाणी मिळणार ‘शिवभोजन’
- राष्ट्रवादी हुशार, गरीब घरचा गृहमंत्री, चिल्लर त्याला, नोटा बारामतीला; पडळकरांचा हल्लाबोल
- सीमावासीय आणि मराठी याबद्दलच प्रेम आम्हाला शिकवण्याची गरज नाही, राऊतांचा फडणवीसांना टोला
- विनाकारण फिरणाऱ्या लोकांना अगोदर सूचना द्या, मग कठोर कारवाईला सुरुवात करा – देसाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

