Share

‘घराघरात भांडणं लावून घरं फोडली त्या शरद पवारांच्या घरातच आता टोकाची भांडणं सुरू आहेत’

Published On: 

🕒 1 min read

पंढरपूर : पंढरपूरमध्ये सध्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या मतदारसंघावर विजय मिळवण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी ठाण मांडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे.

दरम्यान, आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी भाजप आणि राष्ट्रवादीने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामूळे निवडणूकीच्या रणधुमाळीची चुरस वाढली आहे. या निवडणूकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना तर भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला होता. तसेच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. ‘ज्यांनी राज्यात घराघरात भांडणं लावून घरं फोडली त्या शरद पवारांच्या घरात आता टोकाची भांडणं सुरू आहेत. नियतीचा न्याय इथेच पाहायला मिळतो.’ असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!