Share

सूर्यकुमार यादववर नाराज डेव्हिड वॉर्नर ; ट्विट करत म्हणला, ‘मला विश्वास बसत नाहीये’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरु आसलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाला. यानंतर बीसीसीआयने ही स्पर्धा अर्ध्यातच स्थगित केली. काही दिवसातच बीसीसीआयने आयपीएल २०२१च्या उर्वरीत सामन्याची घोषणा केली. येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये आयपीएल २०२१ स्पर्धेच्या उर्वरीत सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.

आगामी आयपीएल स्पर्धेत बीसीसीआयने दोन नवीन संघाच्या समावेशावर जवळपास शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे आगामी स्पर्धेपुर्वी खेळाडूंचा लिलाव होणार हे नक्की झाले आहे. या लिलावाचा सर्वात जास्त फटका मुंबई इंडियन्सला बसणार आहे. कारण समोर आलेल्या माहितीनुसार प्रत्येक संघाला ४ खेळाडू रिटेन करता येणार आहे. तर या चार खेळाडूंत केवळ २ विदेशी खेळाडूंना रिटेन करता येईल.

दरम्यान, जर मुंबई इंडियन्सनं सूर्यकुमार यादवला रिलीज केले तर सर्व फ्रंचायझींमध्ये त्याला आपल्या ताफ्यात दाखल घेण्यासाठी चढाओढ रंगलेली पाहायला मिळेल. दरम्यान, सूर्यकुमार यादवनं त्याची आयपीएलमधील ऑल टाईम प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आणि त्याआधी त्याच्यासमोर काही अटी ठेवल्या होत्या. एक- त्यानं स्वतःला संघात निवडावे आणि दुसरी – मुंबई इंडियन्सचे फक्त चारच खेळाडू संघात असायला हवेत. सूर्यकुमार यादवनं आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केल्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर नाराज झाला आहे. तसे त्याने ट्विट देखील केले आहे. ‘माझं नाव नाही यावर विश्वासच बसत नाहीए’, असे मत व्यक्त केले आहे.

सूर्यकुमार यादवची प्लेईंग इलेव्हन :

जोस बटलर ( यष्टीरक्षक), रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एबी डिव्हिलियर्स, हार्दिक पांड्या, आंद्रे रसेल, रवींद्र जडेजा, राशिद खान, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!