मुंबई : कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमी कामाचा धडाका सुरू केला आहे. कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यांत मिळून सुमारे २३० कोटी रुपयांची विविध विकास कामे होणार आहेत. या कामांचे भूमिपूजन आज(१३ नोव्हें.) पार पडले आहे. कर्जत-जामखेडमधील विविध विकास कामांचा अजित पवार, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि दत्तामामा भरणे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. दरम्यान, यावेळी राज्याचे बोलत असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यावेळी बोलत असतांना पवार म्हणाले की,’काही लोकांनी निवडणुका समोर ठेवून काही तरी थातुरमातुर सांगण्याचा प्रयत्न केला. जामखेडमध्ये पिण्याच्या पाण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. पिण्याचे पाणी जास्त दाबाने मिळावे यासाठी एकनाथ शिंदे आणि मी प्रयत्न केला. रोहित पवार यांनी पाठपुरावा केली आणि आता आपण ही योजना मार्गी लावली आहे. मागे लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असताना त्यावेळचे मुख्यमंत्री इथे आले होते. त्यांनी एक कागद दाखवला आणि सांगितले तत्वतः तुमची योजना मंजूर केली आहे. तत्वतः म्हणजे काय? एकदा योजना मंजुर तरी करायला हवी किंवा मंजुर करणार आहोत असे सांगितले पाहिजे. मी पण अनेक वर्षे काम करत आहे. पण तत्वतः म्हणजे काय? काहीतरी लोकांची दिशाभूल करुन वेळ मारून न्यायचे काम केले.’
दरम्यान, पुढे आमदार राम शिंदे यांच्यावर निशाणा साधत पवार म्हणाले की,’ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय दिले पाहिजे. आम्ही आमदारांचा निधी चार कोटी केला. मात्र केंद्राने खासदारांचा निधी बंद केला होता. आधीच्या आमदारांच्या कामाचा दर्जा चांगला नव्हता. त्यामुळे केलेले काम अडचणीत येत होते. आज रोहित पवार प्रयत्न करत आहे.’
महत्वाच्या बातम्या
- एस. टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा- राज ठाकरे
- पुस्तकाच्या वादावर सलमान खुर्शिद यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- एकरकमी ‘एफआरपी’साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; दोन ट्रॅक्टरला लावली आग
- कंगनाबेनच्या बाबतीत टिळकांचं विधान तंतोतंत खरं- संजय राऊत
- ‘जेपी नड्डांनी कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नये, नाहीतर भाजप महाराष्ट्रातून नष्ट होईल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

