चंडीगड – पंजाबच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला आहे. अमरिंदर सिंगआणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मोठा वाद पाहायला मिळत होता. पक्ष श्रेष्ठींनी मध्यस्थी करून देखील सिद्धू हे खोड्या काढत असल्याचे दिसत होते यामुळेच वैतागून अखेर अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला आहे.
सिद्धू समर्थक 40 आमदारांनी चिठ्ठी लिहून नाराजी व्यक्त केल्यानंतर आता आज या आमदारांची बैठक होत आहे. आज संध्याकाळी चंदीगडच्या सेक्टर 15 येथील काँग्रेस भवनमध्ये ही बैठक होत आहे मात्र त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, कॉंग्रेस अध्यक्षांशी मी सकाळी बोललो आणि मी तेव्हाच ठरवले होते की आज राजीनामा देणार. माझ्यावर पक्षाचा विश्वास राहिला नाही असे मला वाटले. मी आता राजीनामा दिला आहे आता पक्षाला ज्या नेत्यावार विश्वास आहे त्या नेत्याला आता मुख्यमंत्री बनवावे.
माझा अपमान होत आहे असं मला वाटलं. पुढील राजकारणासाठी माझ्याकडे राजकीय पर्याय उपलब्ध आहेत. माझी आगामी काळात राजकीय भूमिका काय असेल हे माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून ठरवू असं ते म्हणाले. दरम्यान, अमरिंदर सिंग यांच्या विरोधात 40 आमदारांनी दंड थोपटल्यानंतर आज संध्याकाळी काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली आहे. यात विधीमंडळ नेता निवडण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- काल मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान अन् आज जयंत पाटील आणि फडणवीस एकाच गाडीत
- राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, काहीही चमत्कार होऊ शकतो – विखे
- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रुग्णालयात; बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सुरु आहेत उपचार
- पंजाब कॉंग्रेसमध्ये भूकंप; नेतृत्वाच्या बदलाच्या चर्चांना आले उधाण
- ‘मुख्यमंत्र्यांनी ‘ते’ विधान बीकेसीतील पूल दुर्घटनेवरून लक्ष हटवण्यासाठी दिले?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
