औरंगाबाद : मी पदासाठी लाचार होणारा, पदासाठी भांडणारा, कुठल्याही गटबाजी न करणारा असा कार्यकर्ता आहे. त्यामुळे ज्यावेळी माझे पद काढण्यात आले होते. त्यावेळी मी जी भूमिका घेतली होती तिच भूमिका आजही आहे. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडलेली नाही आणि सोडणारही नाही. अशी प्रतिक्रिया औरंगाबाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे(Suhas Dashrathe) यांनी त्यांच्या भाजप प्रवेशावर दिली आहे. शुक्रवारी दिवसभर सुहास दाशरथे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर त्यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackrey) यांच्या औरंगाबाद दौऱ्यात औरंगाबाद मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांची पदावरून हाकलपट्टी करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी या बाबत निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर दाशरथे समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीचे वातावरण पसरले आहे. समाज माध्यमांवर दाशरथे समर्थक राज ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयाला मोठ्या प्रमाणावर विरोध करतांना दिसून येत आहे. आता सुहास दाशरथे आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये जाणार अशा प्रकारच्या चर्चा शुक्रवारी दिवसभर रंगल्या होत्या.
आता खुद्द सुहास दाशरथे यांनीच याबाबत स्पष्टीकरण देत सर्वांची तोंडे बंद केली आहेत. यावेळी सुहास दाशरथे म्हणाले ज्यावेळी माझ्याकडून जिल्हाध्यक्ष पद काढून घेण्यात आले त्याचवेळी १५ तारखेला मी माझी भूमिका जाहीर केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मी सोडली नाही. आणि सोडणारही नाही. राज ठाकरे यांनी मला जी जबाबदारी दिली आहे किंवा जी जबाबदारी ते मला देतील ती मी पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेल. मात्र मनसेतून मी जाणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यामुळे तूर्तास तरी विरोधकांच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- विधानसभेत काय झोपा काढता का?; अजित पवार कडाडले
- खाकीतली माणूसकी; बेवारस मनोरुग्ण महिलेला पाचोड पोलिसांचा मदतीचा हात..!
- “काँग्रेस-राष्ट्रवादीने मुस्लिमांना बेवकूफ बनवू नये”; नवाब मालिकांच्या वक्तव्यावर खासदार जलील भडकले!
- तुकाराम सुपेसह ‘त्या’ परीक्षेतील भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशीची संभाजी ब्रिगेडची मागणी
- ’12 आमदार निलंबित असताना अध्यक्षपदाची निवडणूक कशी काय घेता?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

