Share

खाकीतली माणूसकी; बेवारस मनोरुग्ण महिलेला पाचोड पोलिसांचा मदतीचा हात..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद:औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एका अज्ञात वाहनाने उडवून दिलेल्या बेवारस मनोरुग्ण महिलेला पाचोड पोलिसांनी मदतीचा हात दिला आहे. या महिलेला अपघातात मार लागलेला असून ती मानसिक रुग्णही होती. महिलेची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने तिला मदत करण्यास पोलिसांना अनेक अडचणी आल्या. मात्र तिला उपचाराची गरज असल्यामुळे पोलिसांनी उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयामध्ये दाखल केले.

ही मनोरुग्ण महिला गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पाचोडसह, मुरमा, थेरगाव, हर्षी, आडगाव जावळे, डोमेगाव आदी परिसरातील रस्त्यावर फिरत असे. मात्र बुधवारी सायंकाळी ही महिला पाचोड-पैठण रस्त्यावर फिरत असतांना तिला अज्ञात वाहनांचा धक्का लागल्यामुळे ती रस्त्याच्या कडेला पडलेली होती. ही बाब रस्त्यावरून जाणार्‍या प्रवाशांच्या लक्षात आली असता त्यांनी या घटनेची माहिती पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश सुरवसे यांना दिली.

सुरवसे यांनी तत्काळ साहायक फौजदार सुधारक मोहिते, बीट जामादार प्रशांत नांदवे, पवन चव्हाण, संदिप पाटेकर सह महिला पोलीस कर्मचारी शोभा झिंजूर्डे यांना घटनास्थळी पाठवून या महिलेला विचारपूस केली. मात्र ती काही बोलत नसल्याने तिचे नाव, पत्ता अद्यापही समजू शकले नाही. या अनोळखी महिलेला मानसिक आजारांनी ग्रासले आहे. अंगावर सर्वत्र जखमा झालेल्या आणि त्यातून रक्तस्त्राव होत होता.

त्यामुळे पोलिसांनी तिला सर्वप्रथम पाचोड येथील ग्रामीण रूग्णालयात नेले आणि तिच्यावर प्राथमिक उपचार केले. वैद्यकीय तपासणी केली असता सदरील महिला मनोरुग्ण असल्याचे पोलिसांना कळाले. त्यामुळे तिच्यावर वेळीच उपचार होणे गरजेचे असल्याने पोलिसांनी या संदर्भात एका सामजिक संस्थेला दुरध्वानीवरुन संपर्क साधला सदरील संस्थेने महिलेला औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात नेण्यासाठी मदत केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!