🕒 1 min read
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली असून 28 डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. नेहमीप्रमाणे यंदाच्याही हिवाळी अधिवेशनाची सुरुवात तापलेल्या वातावरणाने झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरुन सध्या राजकीय वर्तुळात शाब्दिक वाद सुरु आहेत.
विधीमंडळात कोणतीही चर्चा न करता विधानभा अध्यक्ष निवडीचे नियम बदलण्यात येत आहेत. लोकशाहीतील अनेक प्रथा हे सरकार मोडीत काढत असल्याचा आरोप भाजपचे (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केला आहे. मुळात बारा आमदार निलंबित असताना अध्यक्षपदाची निवडणूक सरकार घेऊ शकत नाही, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
राज्य सरकार सभागृह चालविण्याचे कोणतेही नियम पाळत नाही. सर्व नियम पायदळी तुडवत आहेत.लोकशाहीच्या किमान प्रथा पाळण्याचे सौजन्य देखील या सरकारजवळ नाही. वास्तविक चालू अधिवेशन किमान एक आठवडा चालविणे गरजेचे असताना सरकार अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करीत आहे. कोरोनाचे कारण देऊन गेल्या 2 वर्षात विधानसभेचे कामकाज या सरकारने होऊ दिले नाही, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
गेल्या हिवाळी अधिवेशनात भाजपच्या 12 आमदारांना सभागृहातून एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले. या अधिवेशनात हे निलंबन मागे घेण्याची अपेक्षा होती. मात्र,अधिवेशन सुरू झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्यावतीने निलंबित आमदारांचे निलंबन मागे घेण्याबाबत कोणताही कार्यवाही झालेली नाही, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- “वाघाला घाबरून पटकन म्याव म्याव अशी प्रतिक्रिया आली असेल”
- “तुमचं सरकार घोटाळेबाज होतं म्हणून तुम्हाला सगळीकडे घोटाळेच दिसतात”
- ‘अतरंगी’ फोटो शेअर करत नवाब मलिकांनी अप्रत्यक्षपणे उडवली नितेश राणेंची खिल्ली
- आ. दानवेंच्या प्रयत्नांना यश; भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयाचे होणार उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर..!
- “दुखवट्याच्या नावाखाली काही लोक एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहेत”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

