Share

“काँग्रेस-राष्ट्रवादीने मुस्लिमांना बेवकूफ बनवू नये”; नवाब मालिकांच्या वक्तव्यावर खासदार जलील भडकले!

Published On: 

औरंगाबाद : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिमांना बेवकूफ बनवणे सोडून द्यावे. राज्य सरकारने मनात आणल्यास एका दिवसातच आरक्षण देऊ शकते. मात्र आरक्षण देण्याची त्यांची नियतच नाही. गुरुवारी खा. इम्तियाझ जलील(Imtiyaz Jaleel) यांनी विधानसभेत महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. गेल्या काही दिवसात एमआयएमने मुस्लिम आरक्षणावरून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

मुस्लिम समाजाला आरक्षण देणे सर्वस्वी केंद्राच्या हातात आहे. केंद्र सरकार जोपर्यंत आरक्षणाचा कोटा वाढवत नाही तोपर्यंत मुस्लिम समाजाला आरक्षण देणे कठीण आहे. असे वक्तव्य अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलील यांनी कडाडून विरोध करत टिका केली आहे.

खा. जलील म्हणाले, अशाप्रकारे सरकारने मुस्लिमांची फसवणूक केली आहे. जर नवाब मलिक जे बोलत आहेत ते खरे असेल तर तुमच्या सरकारने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दोन महिने आधी २०१४ मध्ये अध्यादेश का आणला? त्या वेळीही ५० टक्के नियम होता. आणि मुस्लिमांना शिक्षणात ५ टक्के आरक्षण देण्याचा आदेश देण्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानेही हे सर्व विचारात घेतले असावे. समाजाला मूर्ख बनवण्याचा हा प्रयत्न आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाराष्ट्रातील मुस्लिमांना उत्तर देणे बाकी आहे. त्यामुळे आता या सरकारने तातडीने ऑर्डनन्स आणून हे आरक्षण द्यावे अन्यथा आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिला आहे.

विधानसभेत गुरुवारी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर गाजला. आमदार अबू आझमी आणि रईस शेख ५ टक्के मुस्लिम आरक्षणाची मागणी करणारे बॅनर घेऊन विधानसभेत पोहोचले. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पाच टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते, असे बॅनरवर लिहिण्यात आलेले होते. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाला घेरले होते. फडणवीस म्हणाले आरक्षण देता येत नाही पण ते लोकांना सत्य सांगू शकत नाही. तोता मर गया मगर राजा को बात बताये कैसे? अशी त्यांची स्थिती झाली आहे. असा टोला यावेळी फडणवीस यांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!