पुणे : काही दिवसांपूर्वी म्हाडा परिक्षेमध्ये झालेल्या घोटाळ्याची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. म्हाडा पेपरफुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) आणि अभिषेक सावरीकर (Abhishek Savarikar) यांच्यासह आणखी एकाला अटक केली होती. सुपेच्या चौकशीनंतर पुणे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात त्यांना 88 लाख रोख आणि सोनं मिळून 89 लाखांचा ऐवज जप्त केला होता.
‘तुकाराम सुपे यांच्याकडे दररोज लाखोंचा घबाड सापडत आहे. शिक्षण विभागात जर लाखो रुपयांचा भ्रष्टाचार असेल तर मग आरोग्य विभाग आणि म्हाडाच्या परीक्षेमध्ये सुद्धा आर्थिक व्यवहार झाला असेल, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे म्हणाले आहेत.
तुकाराम सुपे यांचे हात ओले करण्यामागे अजून बरेच अधिकारी किंवा मंत्री असण्याची शक्यता आहे. तुकाराम सुपे चा मास्टर माईंड कोण…? याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. म्हणून तुकाराम सुपे व टीईटी, आरोग्य विभाग आणि म्हाडा परीक्षेतील भ्रष्टाचाराची यांच्यासह सर्व परीक्षांची सीबीआयमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.
सर्व प्रकरणाची तात्काळ सीबीआय (CBI) चौकशी करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे. सीबीआय चौकशी बाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संभाजी ब्रिगेड पत्र लिहणार असल्याचेही संभाजी ब्रिग्रेडने सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- “वाघाला घाबरून पटकन म्याव म्याव अशी प्रतिक्रिया आली असेल”
- “तुमचं सरकार घोटाळेबाज होतं म्हणून तुम्हाला सगळीकडे घोटाळेच दिसतात”
- ‘अतरंगी’ फोटो शेअर करत नवाब मलिकांनी अप्रत्यक्षपणे उडवली नितेश राणेंची खिल्ली
- आ. दानवेंच्या प्रयत्नांना यश; भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयाचे होणार उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर..!
- “दुखवट्याच्या नावाखाली काही लोक एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहेत”


