🕒 1 min read
पुणे: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पुण्यात भाजपवर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून निशाणा साधला. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून त्यांनी भाजपला चांगलेच सुनावले. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यावारही ताशेरे ओढले.
“कोश्यारी महाराष्ट्रात आल्यानंतर अनेक प्रकार घडत आहेत. राज्यकर्ता म्हणून मी जेव्हा काम करत होतो, तेव्हा अनेक चांगले आणि कर्तृत्ववान राज्यपाल यांचे राज्यासाठी काम पाहता आले. त्यामध्ये पीसी अलेक्झांडर यांच्यासारखे कर्तृत्ववान राज्यपालही आम्ही पाहिले. पण हल्लीच्या राज्यपालावर भाष्य न केलेले बरे. मला अनेक राज्यपालांचे काम पाहता आले. पण कोश्यारी यांच्यासारखा ‘कर्तृत्ववान’ राज्यपाल पाहिला नाही.”, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.
तसेच राज्यपाल यासारख्या घटनात्मक पदावर कोणत्या व्यक्तीला नेमावे हा केंद्र सरकारचा अधिकार आहे. आता १२ आमदारांच्या नेमणुकांबाबत एक वर्ष होऊन गेले, तरी अजूनही आमदारांच्या नेमणुका झाल्यात नाहीत. जर राज्यपालांसारखी व्यक्ती निर्णय प्रक्रियेच्या माध्यमातून पदाची ती प्रतिष्ठा ठेवणार नसतील, तर राष्ट्रपती, पंतप्रधानांनी यासारख्या पदाचा विचार करावा. असेही शरद पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- … आणि शेन वॉर्नने जडेजाला ‘रॉकस्टार ‘ असे नाव दिले !
- “मोदींच्या येण्याला माझा आक्षेप नाही, पण मेट्रोच्या…”, शरद पवारांचे मोठे वक्तव्य
- इंग्लिश कर्णधाराकडून क्रिकेटच्या जादुगारला श्रद्धांजली, भावनिक होत म्हणाला…
- ‘नारायण राणेंनी नवीन देशाचा शोध लावलाय’; कॉंग्रेसची टीका
- Russia-Ukraine war : खोट्या बातम्यांवर आवर आणण्यासाठी रशियाचा मोठा निर्णय; फेसबुकवर बंदी तर..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
