Share

‘गिरीश महाजनांची अनेक गुपितं माझ्याजवळ, त्यामुळे मला जीवे मारण्याच्या धमक्या’

Published On: 

जळगाव : राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने केलेल्या गौप्य स्फोटामुळे जळगावसह महाराष्ट्रातील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांनी, ‘माजी मंत्री गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्यासोबत अनेक वर्षे असल्याने त्यांची अनेक गुपिते आपल्याजवळ आहेत. मात्र भाजप सोडून राष्ट्रवादीत गेल्याने दोघांकडून आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत,’ अशी तक्रार केली आहे.

प्रफुल्ल लोढा हे जामनेरचे आहेत. त्यांनी जीवे मारण्याची तक्रार करत माजी जलसंपदा मंत्री व जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांच्यासह रामेश्वर नाईक यांच्यावर गंभीर आरोप केल्याने खळबळ माजली आहे. दरम्यान, लोढा यांनी केलेल्या या आरोपांवर रामेश्वर नाईक यांनी बोलण्यास नकार दिला.

तर, ‘लोढा हे दर महिन्याला तक्रारी करत असतात. खरंच त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांकडे द्यावेत,’ असं आव्हान गिरीश महाजन यांनी दिलं आहे. प्रफुल्ल लोढा यांनी गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांची चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे. दुसरीकडं प्रफुल्ल लोढा यांच्याकडे अशी काय गुपितं आहेत? असा सवाल निर्माण होत असून ते पोलिसांना याबाबत पूर्ण माहिती देणार का? हे महत्वाचं ठरेल.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!