पुणे : पुणे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. विद्येचा वारसा लाभलेल्या या शहरात देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. याच शहराचा डंका पुन्हा एकदा देशपातळीवर गाजत आहे. काही वेळापूर्वी जाहीर झालेल्या जेईई ऍडव्हान्स निकालामध्ये आयआयटी मुंबई (बॉम्बे) झोनमध्ये येणाऱ्या चिराग फलोर याने ऑल इंडिया रॅकिंग(AIR) मध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.
पुण्याच्या चिराग फलोरच्या या यशामुळे पुण्यासह राज्याच्या अभिमानाचा यशाचा तुरा रोवला आहे. पुण्याच्या चिराग फलोरने आधीच १८ वर्षाखालील सर्वात उच्च नागरी पुरस्कार असलेला बाल शक्ती पुरस्कार देखील प्राप्त केला आहे. सद्या एमआयटी, यूएसएमध्ये शिक्षण घेणाऱ्या चिरागने अनुभव घेण्यासाठी जेईई ऍडव्हान्स परीक्षा दिली. ज्यात त्याने यश प्राप्त करत ३९६ पैकी ३५२ गुण मिळवले आहेत. चिरागच्या म्हणण्याप्रमाणे आयआयटी प्रवेश परीक्षा ही एमआयटी, यूएसएच्या परीक्षेहून आव्हानात्मक आहे.
जानेवारीमध्ये झालेल्या जेईई मेन परीक्षेत त्याला ९९.९८९७ टक्के मिळाले. सप्टेंबरमध्ये झालेल्या जेईई परीक्षेस तो पुन्हा बसला आणि १०० टक्के गुण मिळवून १२ व्या स्थानी आला होता. दरम्यान, आज लागलेल्या जेईई ऍडव्हान्स निकालात कनिष्का मित्तलने मुलींमध्ये बाजी मारली आहे. तिला ३१५ गुण मिळाले असून देशातून १७ व्या स्थानी ती आली आहे. तर , देशातील 1,50,838 विद्यार्थ्यापैकी 43204 विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- …तर मी भाजपात प्रवेश करेन,बच्चू कडू यांनी दिले थेट मोदींना आव्हान
- ‘…त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत?’ शिवसेनेचा कंगनावर जहरी घणाघात
- ‘शिवसेना उड्या मारायला लागली… एवढ्या लवकर डीजे वाजवू नका’ निलेश राणेंचा टोला
- मिशन बिगिन अगेन : रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्याबाबत कार्यप्रणाली जाहीर
- लोकजनशक्ती पार्टी संस्थापक रामविलास पासवान यांची प्रकृती आणखी खालावली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

