Share

“I Hate kashmir Files…”राम गोपाल वर्मांच्या वक्तव्यावर विवेक अग्निहोत्री म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने काश्मिरी पंडितांचा मुद्दा चर्चेत आणला आहे. या चित्रपटाचे देशभरातून कौतुक होत आहे. या चित्रपटावर निर्माते राम गोपाल वर्मा यांनी त्यांचा रिव्ह्यू दिला आहेत. तर यावर विवेक अग्निहोत्री यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर ‘आय हेट काश्मीर फाइल्स’ नावाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला राम गोपाल वर्मा म्हणाले, “माझ्या संपूर्ण कारकिर्दीत पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाबद्दल रिव्ह्यू देत आहे. मी चित्रपटाच्या विषयावर किंवा वादग्रस्त असलेल्या कंटेटचा रिव्हू देत नाही, एक चित्रपट निर्माता म्हणून हा चित्रपट कसा बनवला याचा रिव्ह्यू द्यायचा आहे.” यानंतर राम गोपाल वर्मा यांनी व्हिडिओमध्ये या चित्रपटाचे कौतुक केले. त्यांनी चित्रपटाच्या निर्मितीचे आणि त्यातील भूमिका आणि कथेचे कौतुक केले. तर त्यांना अनुपम खेर यांचा अभिनय आवडल्याचे ते म्हणाले आहेत.

हा व्हिडीओ ट्विटवर शेअर करत राम गोपाल वर्मा, म्हणाले “बॉलीवूड, टॉलीवूड द काश्मीर फाइल्सच्या यशाकडे दुर्लक्ष करत आहेत. हे खरं आहे की हा चित्रपट प्रेक्षकांनी जितका गांभीर्याने घेतला त्यातून जास्त गांभीर्याने ते घेत आहेत. पण ते शांत राहण्याचे कारण ते घाबरले आहेत.” तर राम गोपाल वर्माच्या ट्वीटला रिट्वीट करत विवेक अग्निहोत्री म्हणाले, “तू द काश्मीर फाइल्ससा हेट करतोस म्हणून माझं तुझ्यावर प्रेम आहे.”

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!