Share

‘द महाराष्ट्र फाईल्स’ बनवण्याची बॉलिवूडमध्ये कुणात हिंमत आहे का?; मोहित कंबोज यांचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: सध्या देशभरात आणि राज्यात ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून राजकारण रंगताना दिसून येते आहे. काँग्रेसकडून या चित्रपटात सत्यता लपवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. तर भाजपकडून हा चित्रपट म्हणजे कॉंग्रेसमुळे काश्मिरी जनतेला भोगावे लागणारे अन्याय, अत्याचार असल्याचे ज्वलंत उदाहरण म्हटले जात आहे. आता यातच भाजप नेते मोहित कंबोज (BJP leader Mohit Kamboj) यांनी थेट बॉलिवूडलाच सवाल केला आहे.

“बॉलिवूडमध्ये असे कुणी आहे का, जो हिंमत करून ‘द महाराष्ट्र फाईल्स’ आणि ‘ट्रूथ बिहाईंड दाऊद अॅंड नेतास नेक्सस’ यावर चित्रपट बनवेल.”, असे ट्वीट मोहित कंबोज यांनी केले आहे. दरम्यान ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांही बघितला असून त्यांनीही याचे कौतुक केले आहे. तर यावरच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींना निशाण्यावर धरत अनेक सवाल केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणण्याची घोषणा केली होती. तेव्हा आता मोदीजी तुम्ही पाकव्याप्त काश्मीर पुन्हा हिंदुस्तानाला कधी जोडत आहात? जे वीर सावरकर यांचे स्वप्न होते ते पूर्ण झाल्याचे आम्हाला या जन्मात पाहता येईल का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. दरम्यान या चित्रपटावर आतापर्यंत अनेक प्रतिक्रिया उमटल्या असून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून सत्य लपवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!