Share

१११ मिनिटे केवळ धावांचा पाऊस; २० वर्षीय खेळाडूने रचला नवीन इतिहास!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: क्रिकेट हा एक असा खेळ आहे ज्यामध्ये दररोज विक्रम होतात आणि मोडले जातात आणि असेच काहीसे अलीकडे पाहायला मिळाले आहे. टी ट्वेंटी फॉरमॅटमध्ये खेळाडू अनेकदा मोठे रेकॉर्ड बनवतात. असेच काहीसे वनडे क्रिकेटमध्ये पाहायला मिळाले आहे. एका २० वर्षीय फलंदाजाने संपूर्ण १११ मिनिटे आपल्या बॅटने गोलंदाजांना नाचवले आणि या खेळीमुळे संघाला विजय मिळवून दिला.

ज्या खेळाडूने ही कामगिरी करून दाखवलीये तो दुसरा तिसरा कोणी नसून तमीम सुरखुरोडी (tamim surkhurdi) आहे, ज्याने वजीर मोहम्मद अकबर खान ग्रेड-१ वनडे स्पर्धेत खेळल्या गेलेल्या सामन्यात आपल्या धमाकेदार खेळीने सर्वांना आश्चर्यचकित केले होते. रविवार, 20 मार्च रोजी, नॉन-प्रोव्हिन्स आणि हेलमंड प्रोव्हिन्स यांच्यात क्रिकेटचा हा एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात २० वर्षीय सलामीवीर तमिमने आपल्या लिस्ट ए कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी खेळून नवा विक्रम केला आहे.

सलामीवीर तमिमने डावाची सलामी दिली होती. यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद इसाकसोबत पहिल्या विकेटसाठी त्याची जोडी अशा प्रकारे क्रिझवर स्थिरावली की, गोलंदाजही पाणी भरताना दिसले. तमिमने १११ मिनिटे क्रीजवर बॅटने फटकेबाजी खेळणे सुरूच ठेवले. यादरम्यान त्याने ११७ चेंडूंचा सामना करत १३५ धावांची अप्रतिम खेळी खेळली. यादरम्यान त्याने ११५.३८ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि ११ चौकारांसह ७ षटकारही ठोकले. लिस्ट ए क्रिकेटमधला तमीमचा हा सहावा सामना होता, ज्यात त्याने १३५ धावांची धडाकेबाज खेळी खेळून कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. याआधी खेळलेल्या ५ सामन्यात त्याने केवळ १३५ धावा केल्या होत्या. म्हणजेच सहाव्या डावात त्याने ५ सामन्यांच्या धावांची बरोबरी साधली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!