Share

शिवजयंतीवरून मनसे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वाद!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे. दरवर्षीप्रमाणे शिवसेनेकडून राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये कार्यक्रमांचं आयोजन केलं जाते. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही मोठ्या उत्साहाने राज्यभरात शिवजयंती साजरी केली जातेय. अशातच शिवजयंतीवरून मनसे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वाद होत असताना पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यास विरोध केला आहे. या विरोधाला मनसेचे नेते अमेय खोपर यांनी विरोध केला. मनसे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील हा शाब्दिक वाद एकमेकांची अक्कल काढण्यापर्यंत गेला आहे.

अमोल मिटकरी म्हणाले, “शिवजयंती ही १९ फेब्रुवारीलाच साजरी झाली पाहिजे. रोज होत असली तरी हरकत नाही पण तिथीनुसार साजरी होताना दिसतेय यामध्ये व्होट बँकचं राजकारण दिसत आहे.” यावर अमेय खोपकर यांनी प्रत्युत्तर दिले म्हणाले, “मी मिटकरींच्या वक्तव्यांना फारसं महत्व देत नाही. आजचा दिवस सण साजरा करण्याचा आहे. मिकटरींनी एक गोष्ट लक्षात घ्यावी. आपण दरवर्षी दिवाळी, गणपती आणि हिंदू धर्माचे सण साजरे करतो ते तारखेनुसार साजरे करत नाही. देशातील नव्हे जगातील सर्व लोकांसाठी छत्रपती शिवाजी महारांची जयंती हा एक सण आहे. आम्हीही तो सण म्हणूनच साजरा करतो,” असं वक्तव्य केलं.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!