Share

मुंबईला जाण्यास नकार देणे पडले १४ एस.टी. कर्मचाऱ्यांना महागात

Published On: 

बीड: मुंबईतील बेस्ट बसच्या सेवेसाठी जबरदस्ती बीड येथील एस.टी. बस वाहक तसेच चालकांना पाठवण्यात येत होते, मात्र काही कर्मचाऱ्यांनी यास नकार दिला आणि त्यांचा हा नकार त्यांच्या निलंबनासाठी कारणीभूत ठरला. परळी आगारातील १४ बसचालक व वाहकांना शनिवारी या कारणामुळे निलंबित करण्यात आले. या घटनेमुळे परळी आगारातील बस वाहक व चालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील एस.टी. कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठवण्यात येत होते. पण मुंबईला गेलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. मुंबई येथील बेस्टच्या सेवेसाठी कर्मचारी पाठवण्यात येत आहेत. पण तिकडे जाऊन कोरोनाबाधित होऊ, या भितीमुळे कोणी तिकडे जाण्यास धजावत नाहीये. जर आम्हाला काही झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल एस.टी. कर्मचाऱ्यांकडून उपस्थित होत आहेत.

मुंबईला जाण्यास नकार देणाऱ्या परळी येथील १४ कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काढले आहेत. यावर परळी आगारप्रमुख प्रवीण भोंडवे म्हणाले, सुरळीतपणा आणण्यासाठी नाईलाजास्तव कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश काढावे लागले. कर्मचाऱ्यांनी कर्तव्याचा भाग म्हणून ड्युटी करावी, असे वक्तव्य आगारप्रमुखांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय व विशेष साहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात जाऊन कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांनी व्यथा मांडली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!