Share

लॉकडाऊन काळात मजुरांना घरी पोहोचवणाऱ्या एसटी चालकांच्या पदरी निराशा

Published On: 

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात श्रमिक मजुरांसाठी एसटीने चालकांच्या जोरावर मदतीचा हात दिला. मात्र या काळात ज्या चालकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता हे काम केले त्यांनाच एसटी महामंडळाने प्रोत्साहन भत्ता देण्यास डावलल्याने चालकांच्या पदरी घोर निराशा आली आहे.

लॉकडाऊनच्या काळात या चालकांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चालकांच्या वतीने या निर्णयाचे स्वागतही झाले. प्रोत्साहन भत्ता मिळेल या अपेक्षेने चालकांनी कोरोनाकाळात परराज्यात जा ये करत एसटीच्या तब्बल ३९३ फेऱ्या केल्या. ३९३ चालकांनी परराज्यातील तब्बल ८,७२९ श्रमिकांना सुखरूप आपापल्या राज्यांच्या सीमेपर्यंत पोहचवले.

एवढे आव्हानात्मक काम करूनही महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याच चालकांच्या तोंडाला पाने पुसली. प्रतिदिन ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय झालेला असतांना या प्रोत्साहन भत्याचा निर्णय केवळ कागदोपत्रीच ठेवून अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निदर्शनास आले आहे. गेल्या दहा महिन्यापासून हा प्रोत्साहन भत्ता न मिळाल्याने चालकांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे.

एसटी महामंडळ तसेच शासनाच्या या ढिसाळ कारभारावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी काळात आक्रमक भूमिका घेत असून चालकांना तातडीने प्रोत्साहन भत्ता न मिळाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात येत आहे.
राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, मराठवाडा अध्यक्ष अशोक पवार पाटील, जिल्हा अध्यक्ष उमेश दीक्षित, विभागीय अध्यक्ष एन. डी. दिनोरिया, मीरा चव्हान यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!