परभणी : प्रत्येक कोविड सेंटरमध्ये वेळोवेळी जाऊन रुग्णांची तब्येतीची तसेच मिळणाऱ्या सोई – सुविधांबाबत नियमीत आढावा घेणार आहोत. त्यामुळे सर्व प्रशाकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील अतिशय चोखपणे स्वत:ची जबाबदारी पार पाडावी, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यामध्ये कोविड – 19 च्या प्रादुर्भावाने बाधित झालेल्या रुग्णांना औषधोपचार व आरोग्य विषयक सुविधा व्यवस्थित आणि वेळेवर मिळत आहेत का? याची खात्री करण्या करिता जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी सोमवारी (दि.29) परभणी येथील आयटीआय, वसमत रोडवरील अक्षदा मंगल कार्यालय, रेणुका मंगल कार्यालय येथील कोविड सेंटरला भेटी दिल्या. यावेळी कोविड संसर्गाच्या रुग्णांना भेटून विचारपूस देखील केली आणि त्यांच्या समस्या देखील या वेळी जाणुन घेतल्या आहेत.
या भेटी दरम्यान प्रत्यक्ष रुग्णांच्या कक्षामध्ये प्रवेश करुन प्रत्येक रुग्णास त्यांच्या तब्येतीची तसेच त्यांच्या समस्या आणि अडचणींबाबत शिवानंद टाकसाळे यांनी व्यक्तिशः विचारपुस देखील केली. त्यांना काही असुविधा असल्यास सांगणे बाबत विचारणा केली. तसेच आहारामध्ये आपणास मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा व इतर आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधाची माहिती प्रत्यक्ष रुग्णांकडून घेतली. तसेच आयटीआय सेंटरच्या भेटी दरम्यान त्यांच्या सोबत डॉ. कदम व तेथे कार्यरत असणाऱ्या अधिपरिचारीका, वार्ड बॉय, सफाईकामगार यांना आवश्यक त्या सुचना देवून कोणतीही सुविधा कमी पडणार नाही. याची काटेकोरपणे दक्षता घेण्याच्या सुचना या वेळी टाकसाळे यांनी दिल्या आहेत. तसेच कार्यरत कर्मचारी यांना काही अडचण निर्माण झाल्यास प्रत्यक्ष दुरध्वनीवरुन संपर्क करण्याचे आवाहन देखील या वेळी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बांगलादेश दौर्यादरम्यानच्या मंदिर भेटीवरून तृणमूलकडून मोदींवर आचारसंहिता भंग केल्याची तक्रार
- चित्रपटातील आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो – उद्धव ठाकरे
- ‘या’ तारखेला विराट आरसीबीच्या कॅम्पमध्ये दाखल होणार
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- ‘बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदींना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

