Share

एमएस रेड्डीवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा ही आमची मागणी आजही कायम आहे : वाघ

Published On: 

मुंबई – काही दिवसांपूर्वी मेळघाटच्या हरिसाल येथील वनक्षेत्राच्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यांचे वरिष्ठ विनोद शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आपले जीवन संपविले होते. यापार्श्वभुमीवर मेळघाट वनक्षेत्राचे माजी प्रादेशिक संचालक एमएस रेड्डी यांना शासनाने निलंबित केले असल्याची माहिती समोर आली आहे.

दीपाली चव्हाण यांनी मृत्यूआधी एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये त्यांनी विनोद शिवकुमार याच्या काळ्या कारवायांबाबत लिहून ठेवले आहे. त्यांनी अनेकदा मेळघाट वनक्षेत्राचे प्रादेशिक संचालक एमएस रेड्डी यांच्याकडे तक्रार करूनही त्यांनी कारवाई केली नाही असेही या पत्रात लिहिले होते. यानंतर आता रेड्डी यांच्यावर राज्य सरकारने कारवाई केली आहे.

दरम्यान,दिपाली चव्हाण प्रकरणात लढाई अजून संपलेली नाही असं भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. रेड्डीचं निलंबन झालयं पण दिपालीला आत्महत्येला प्रवृत्त करण्यास शिवकुमार एकटाचं नाही तर रेड्डी ही तितकाचं जबाबदार त्यामुळे रेड्डीला सहआरोपी करत त्याच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा  हि आमची मागणी आज ही कायम आहे असे त्यांनी म्हटले आहे.

रेड्डीचे निलंबन झाले  हा दिपाली चव्हाण घटनेत आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाचा हा विजय आहे.हा न्याय ती जिवंत असतांना मिळाला असता तर कदाचित आज दिपाली आपल्यामध्ये असती . तिच्या जाण्याने RFO विशेषत: मेळघाटात काम करणाऱ्यांच्या व्यथा समोर आल्या पण त्यासाठी दिपालीला गमवावं लागलं असं वाघ यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!