Share

मी तीन पर्याय दिलेत आता कोण नाही म्हणतोय ते बघतोच ; संभाजीराजे कडाडले

Published On: 

मुंबई : सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण सुरु झाले आहे. अशावेळी मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारने पुढाकार घेऊन आरक्षण द्यावे अशी मागणी राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे.

यामुळेच आता खासदार संभाजीराजे छत्रपती हे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असल्याचे चित्र सध्या पाह्यला मिळत आहे. सध्या संभाजीराजे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून विविध भागांमध्ये समाज बांधवांच्या भेटी व बैठक घेऊन त्यांच्या भावना समजावून घेत आहेत.भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संभाजी छत्रपती यांनी अत्यंत संतप्त भावना व्यक्त केल्या.

तसेच यावेळी संभाजीराजेंनी मराठा आरक्षण टिकवण्यासाठी पर्यायही सांगितले आहेत. यावेळी ते बोलताना म्हणाले कि, ‘ओबीसीमध्ये नवीन प्रवर्ग तयार करणं शक्य आहे का? हे पाहावं, ते मी सांगणार नाही. ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं. वंचितांना आरक्षण मिळावं या मताचा मी आहे. शाहू महाराजांनी वंचितांना मुख्य प्रवाहात आणलं होतं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही भूमिका होती, असंही त्यांनी सांगितले आहे.

संभाजीराजेंनी दिलेले तीन पर्याय :

  • राज्य सरकारने तात्काळ रिव्ह्यू पिटीशन दाखल करावी. हा राज्य सरकारचाच विषय आहे.
  • रिव्ह्यू पिटीशन टिकलं नाही तर क्युरिटिव्ह पिटीशन दाखल करावी. हा शेवटचा पर्याय आहे. पण हा पर्याय अपवादात्मक आहे. त्यासाठी भक्कम पुरावे घेऊनच कोर्टात जावं लागणार आहे.
  • ‘342 अ’ च्या माध्यमातून आपण प्रपोजल केंद्राकडे देऊ शकतो. राज्यपालांच्या माध्यमातून ते राष्ट्रपतींकडे जाणार. राष्ट्रपतींना योग्य वाटलं तर ते केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे देतील. त्यांना योग्य वाटलं तर ते संसदेकडे पाठवतील.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!