मुंबई : सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण सुरु झाले आहे. अशावेळी मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारने पुढाकार घेऊन आरक्षण द्यावे अशी मागणी राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे. तर भाजपकडून दोन दिवसीय अधिवेशन बोलवावे अशी मागणी काही दिवसांपूर्वी जोर धरू लागली होती.
केंद्रात कोरोनाची चिंताजनक परिस्थिती पाहून अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. राज्य सरकार अधिवेशन का घेत नाही, याचं कारण जगजाहीर आहे. राज्य सरकारने अधिवेशन घेण्याची हिंमत दाखवावी असं चंद्रकांत पाटील म्हणतात. केंद्राचा नियम हा प्रत्येक राज्यालाही लागू होतो. त्यामुळे महाराष्ट्रतही अधिवेशन होणार नसल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल आहे. अशी वक्तव्य पाटील हे नेहमीच करत असतात. सर्वजण झोपेत असताना सरकार पडेल अशी भविष्यवाणीही त्यांनी केली होती. यावर स्वप्न पडण्याचा छंद असेल असे प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना दिले आहे. पुण्यात साखर कारखान्याच्या संदर्भात झालेल्या बैठकीत ते विविध विषयांवर बोलत होते.
लॉकडाऊन वाढवण्याबाबत दोन दिवस परिस्थिती पाहूनच मुख्यमंत्री निर्णय घेतील असेही यावेळी सांगितले. राज्यात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येतानाचे चित्र दिसून येत आहे. पॉझिटिव्हीटी रेटही खाली गेले आहेत. पण हा रेट पूर्णपणे कमी होत नाही. तोपर्यंत संकट अजून टळले असे म्हणता येणार नसल्याचे ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘शिवराज नारियलवाले यांना जबर मारहाण करणार्या दोषींवर कठोर कारवाई करा’
- हात जोडून सांगतो माझं-तुझं न करता समाजासाठी एकत्र येऊ; संभाजी राजेंचं फडणवीसांना साकड
- चर्चा तर होणारच : मुख्यमंत्र्यांनी केबिनचा अन् केबिनने मुख्यमंत्र्यांचा चेहरा पाहिला नाही; राणांचा खोचक टोला
- व्हिडीओ काढल्यामुळेच मला पोलिसांनी मारहाण केली, तर कोणताच गुन्हा न नोंदवता सोडून दिले – शिवराज नारीयलवाले
- अखेर त्या गागलेगावच्या लाचखोर तलाठ्याला अटक


