Share

मी पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात कायदा समजवला, त्यांच्याकडे पुरावे दिले-किरीट सोमय्या

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्यांनी ठरल्याप्रमाणे मुश्रीफ यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी तक्रार दिली.

तक्रार दाखल केल्यानंतर सोमय्या यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.
ते म्हणाले, ‘राज्यात घोटाळा करण्याची एक कला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी विकसित केली आहे. विविध पद्धतीने घोटाळे करायचे. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात मी तक्रार दिली आहे. त्याची दखल त्यांना घ्यावी लागणार. कारण ती कंपनी अस्तित्वात नाही. अज्ञात कंपनीच्या नावाने बॅंक अकाऊंटद्वारे पैसे आपल्या कुटुंबाच्या खात्यामध्ये घेतला आहे. म्हणून मी पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात कायदा समजवला. त्यांच्याकडे पुरावे दिले’ असे सोमय्यांनी सांगितले.

सोमय्यांनी मुश्रीफ यांच्यावर दोन गंभीर आरोप केलेले आहेत. कागलमधील सरसेनापती संताजी धनाजी घोरपडे साखर कारखान्यावरून किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांची पत्नी आणि मुलावर मनी लाँडरिंगचा आरोप केला. बोगस कंपन्या दाखवून बेनामी संपत्ती जमवल्याचा दावा करत पिता-पुत्रांच्या १२७ कोटींचे पुरावे आमच्याकडे आहेत असा पहिला आरोप आहे. शिवाय आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यातही बेनामी कंपन्यांद्वारे पैशांची अफरातफर केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. यात त्यांनी मुश्रीफ यांच्यासोबत त्यांच्या जावयाचा सहभाग असल्याचे सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!