Share

‘केंद्र सरकारने किती मदत केली हे माहित नाही पण…’ – जयंत पाटील

Published On: 

🕒 1 min read

सांगली : रायगड, रत्नागिरीसह कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांनी आपला जीव गमावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळी महाड येथील दुर्घटनास्थळाला भेट देत नागरिकांना धीर दिला, अनेकांचं सांत्वन केलं. तसेच, येथील नागरिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारची असून त्यासाठी आराखडा आखण्यात येईल, असेही स्पष्ट केले.

मात्र, विरोधकांनी अनेक कारणांमुळे सरकारला घेरण्याचा आता प्रयत्न केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. ‘महाराष्ट्रात परवापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. चिपळूणमध्ये सुद्धा पाऊस पडला आहे. राज्यात अतिवृष्टीमुळं संकट निर्माण झालं आहे यातून मार्ग कसा काढायचा या साठी विरोधीपक्षाने सरकारला मदत केली पाहिजे. पण ते आता टीका करत असतील तर राजकारण कोण करत आहे हे समजते,’ असं जयंत पाटील म्हणाले.

तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘केद्रं सरकारने किती मदत केली हे माहित नाही पण नक्कीचं केद्रं सरकार मदत करेल,’ असं जंयत पाटील म्हणाले. जयंत पाटील यांनी सांगलीच्या शिरगावमध्ये बोटीतून पूरस्थितीची पाहणी केली. दरम्यान, या भीषण पूरपरिस्थितीतून मार्ग कसा काढायचा यासाठी विरोधीपक्षाने सरकारला मदत करणे अपेक्षित आहे, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!