मुंबई : भाजप नेते आमदार प्रसाद लाड (Mla Prasad Lad) यांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा पसरली आहे. या अफवेनंतर त्यांच्या प्रकृतिची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी एकच गर्दी केली. यामुळे त्रस्त झालेल्या आ. प्रसाद लाड यांनी मला कोरोना झाल्याच्या बातम्या खोट्या आणि चुकीच्या असल्याचे सांगितले आहे. तसेच कोणत्याही बातमीवर विश्वास ठेऊ नये, असे अवाहन त्यांनी ट्विट करत केले आहे.
सोशल मीडिया च्या माध्यमातून मला कोरोना झाल्याच्या बातम्या फिरत आहेत ज्या पूर्णतः खोट्या आणि चुकीच्या आहेत..
काळजी करण्याचे कारण नाही मी एकदम ठणठणीत बरा आहे..
कृपया कोणत्याही बातमी वर विश्वास ठेऊ नये!
धन्यवाद!!
आ.प्रसाद लाड!!— Prasad Lad (@PrasadLadInd) January 7, 2022
याबाबत आ. प्रसाद लाड ट्विट करत म्हणाले, ‘सोशल मीडियाच्या माध्यमातून मला कोरोना झाल्याच्या बातम्या फिरत आहेत, ज्या पूर्णतः खोट्या आणि चुकीच्या आहेत. काळजी करण्याचे कारण नाही, मी एकदम ठणठणीत बरा आहे. कृपया कोणत्याही बातमी वर विश्वास ठेऊ नये! धन्यवाद!! आ.प्रसाद लाड!!’, असे प्रसाद लाड यांनी स्पष्ट केले आहे.
प्रसाद लाड यांचे जुने ट्विट, याच ट्विटचे आणि बातम्यांचे स्क्रिनशॉट सध्या व्हायरल होत आहेत.
माझी कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे.डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये औषधोपचार घेत आहे.मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझी विनंती आहे,स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी.
— Prasad Lad (@PrasadLadInd) November 19, 2020
आमदार प्रसाद लाड यांना १९ नोव्हेंबर २०२० रोजी कोरोनाची लागण झाली होती. या जुन्या बातम्यांचे स्क्रिनशॉट व्हायरल केले जात असून लाड यांना कोरोनाची लागण झाल्याची खोटी माहिती पसरवली जात आहे. मात्र यामुळे आमदार लाड यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केल्याने त्रस्त झालेल्या आ. लाड यांना ट्विट करत माहिती द्यावी लागली आहे.
- ‘चकदा एक्प्रेस’ चित्रपटाचा फस्ट लूक शेअर ; जाणून घ्या कोण असणार महिला क्रिकेटरच्या भूमिकेत?
- ‘मोदी ड्रामा बंद करो’; नाना पटोलेंचा पंतप्रधानांवर निशाणा
- वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा; पाकिस्तानशी होणार पुन्हा सामना!
- अभिनेत्री मेहक चहलला मिळत नाही ‘वर’ म्हणाली, “मी अरेंज मॅरेजसाठी…”
- ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला निधी मिळण्याबाबत शासन निर्णय जारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

