मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) पंजाब दौऱ्यादरम्यान उद्भवलेल्या सुरक्षा प्रश्नावरून राजकारण चांगलेच तापले आहे. यामागे मोठे कटकारस्थान होते, असा दावा करत भाजपने (BJP) पंजाब सरकारवर तसेच कॉंग्रेस (Congress) पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही चूक नसल्याचे राज्य सरकार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची होणारी सभा या प्रकारामुळे रद्द करण्यात आली. मात्र ही सभा रद्द करण्यामागे सुरक्षेचा प्रश्न नसून सभेला गर्दी नव्हती म्हणून ही संबहबा रद्द केली, अशी टीका कॉंग्रेस नेत्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचा विश्वास घात केला. पण शेतकऱ्यांनी आपला लढा सुरु ठेवला आणि हुकुमशाही वृत्तीच्या पंतप्रधानांची घमंड जिरवली, अशा शब्दात त्यांनी मोदींवर टीका केली आहे.
पूर्वीही पंतप्रधानांना विरोध व्हायचे. मात्र ते त्याला सामोरे जायचे.
आता मात्र विरोध झाल्यावर पंतप्रधानांचा जीव लगेच धोक्यात येतो,एयरपोर्टवर जिवंत पोहचलो म्हणत पंतप्रधान सुटकेचा निःश्वास सोडतात. सत्ताधारी पक्ष यावरुन रान पेटवतो आणि गोदी मीडिया त्याला हवा देतो.#मोदी_ड्रामा_बंद_करो pic.twitter.com/y4cYpP1Nyd— Nana Patole (@NANA_PATOLE) January 6, 2022
नाना पटोले (Nana Patole) यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधत म्हणलं, पूर्वीही पंतप्रधानांना विरोध व्हायचे. मात्र ते त्याला सामोरे जायचे. आता मात्र विरोध झाल्यावर पंतप्रधानांचा जीव लगेच धोक्यात येतो, एयरपोर्टवर जिवंत पोहचलो म्हणत पंतप्रधान सुटकेचा निःश्वास सोडतात. सत्ताधारी पक्ष यावरुन रान पेटवतो आणि गोदी मीडिया त्याला हवा देतो, अशा शब्दात नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला निधी मिळण्याबाबत शासन निर्णय जारी
- रायगडावरील ‘मदार मोर्चा’वर चादर घालून प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न; संभाजीराजेंच्या पत्रानंतर कारवाई
- ‘गुलाबराव पाटलानी केलेलं वक्तव्य आक्षेपार्ह नव्हतं?’ चित्रा वाघ यांचा शिवसेनेवर पलटवार
- लग्नाच्या तब्बल ९ वर्षांनंतर अभिनेता आमिर अली आणि संजीदा शेख यांचा घटस्फोट
- ‘एखाद्याला आयुष्यातून कसं उठवावं याचा कारखाना म्हणजे भाजप’; मनीषा कायंदे यांची भाजपवर जोरदार टिका


