Share

वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा; पाकिस्तानशी होणार पुन्हा सामना!

Published On: 

आयसीसी महिला विश्वचषक २०२२ आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. मिताली राज संघाची कर्णधार असेल तर हरमनप्रीत कौरला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर स्मृती मानधना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा आणि झुलन गोस्वामी या दिग्गज खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे.

ऋचा घोष आणि तानिया भाटिया यांच्या रूपाने संघात दोन यष्टिरक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर जेमिमा रॉड्रिग्ज आणि वेदा कृष्णमूर्ती यांना संघात स्थान मिळालेले नाही. स्टँडबाय खेळाडू म्हणून तीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सबीनीन मेघना, एकता बिश्त आणि सिमरन दिल बहादूर यांची नावे प्रमुख आहेत.

भारतीय संघाला ११ फेब्रुवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. शेवटचा एकदिवसीय सामना २४ फेब्रुवारीला होणार आहे. यापुर्वी टीम इंडिया ९ फेब्रुवारीला एकमेव टी-२० सामनाही खेळणार आहे.

विश्वचषकात भारतीय संघ ६ मार्चला पाकिस्तानविरुद्ध खेळत आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. तर टीम इंडियाचा दुसरा सामना १० मार्चला न्यूझीलंडशी होणार आहे. यानंतर भारताला वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध सामने खेळावे लागतील.


मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा,  ऋचा  घोष   (wk), स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया भाटिया (wk), विकेटकीपर), राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादव.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!